crime

शिरुर तालुक्यात गुटका, मटका आणि इतर अवैध व्यवसाय जोमात; पोलिस मात्र कोमात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुणे ग्रामीणचा कार्यभार स्विकारल्या नंतर पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंद्यावर मोठया प्रमाणात कारवाया करण्याचा सपाटा लावला आहे. शिरुर तालुक्यात कारेगाव आणि शिरुर येथे चालणाऱ्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर कारवाई केल्यानंतर शिरुर तालुक्यातील इतर अवैध धंद्यावर कारवाई कधी होणार…? याकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

 

शिरुर तालुक्यात शिक्रापुर, रांजणगाव MIDC आणि शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत मोठया प्रमाणात गुटखा, मटका आणि गावठी दारु तसेच इतर अवैध व्यवसाय चालु असुन त्याचा सर्वसामान्य जनतेला मोठया प्रमाणात त्रास होत आहे. तसेच पान टपरीवर मोठया प्रमाणात मसालायुक्त पान-सुपारीच्या नावाखाली ‘खर्रा’ सारख्या आरोग्याला घातक असणाऱ्या पदार्थाची विक्री होत आहे. तसेच हा ‘खर्रा’ वेगवेगळ्या पानामध्ये टाकुन विकला जात आहे. तरुणवर्ग मोठया प्रमाणात या खर्राच्या आहारी गेली असल्याचे चित्र शिरुर तालुक्यात अनेक पान टपरीवर पहायला मिळत आहे.

 

त्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी आता या अवैध धंद्यावर कारवाई करावी असा सुर सर्वसामान्य जनतेतुन उमटत आहे. तसेच पान टपरीवर मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांवर ‘अन्न औषध व प्रशासन’ विभागाने तपासणी करुन कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे. तसेच शिरुर तालुक्यात एवढ्या मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय चालु असताना स्थानिक पोलिस नक्की काय करतात…? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

शिरुरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई; तीन जणांवर गुन्हा दाखल