कोरफडीचे आरोग्यदायी फायदे

आरोग्य

कोरफड हे घरोघरी अंगणात दिसणारे एक क्षुप असून त्याचे अनंत चिकित्सीय उपयोग आहेत.कोरफडीच्या हजारो जाती असून अत्यंत रुक्ष वातावरणात जगणारी आणि व्यवस्थित वाढणारी हि वनस्पती आहे. परदेशात कोरफडीवर पुष्कळ संशोधन झाले असून बाजारात कोरफडीपासून बनवलेली अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. कोरफडीच्या गरगरीत पानांचा रस औषधात वापरतात,मात्र नेहमीप्रमाणे ठेचून पिळून हा रस निघत नाही त्यासाठी मोदक उकडतो तसे वाफेवर किंवा भाकरी भाजतो तसे तव्यावर गरम करून मग पिळून रस काढावा.

कोरफडीचे काही सामान्य उपयोग

१) भूक लागत नसेल तर कोरफडीचा रस एक चमचा तेवढाच मध घालून घ्यावा आणि रोज सकाळी घ्यावा, पोट साफ होते आणि भूक लागायला सुरवात होते.

२) उदर म्हणजे पोटात पाणी साचले कि कोरफडीसारखे औषध नाही. दारू प्यायल्यामुळे यकृताची हानी होऊन पोटात पाणी साचते अशा वेळी टेपिंग करून पाणी काढण्याऐवजी कुमारीआसव हे कोरफडीचे औषध दिले तर पातळ जुलाब होऊन पोटातील पाणी कमी होते .. शिवाय यकृताचे कार्य देखील सुधारते.

३) कावीळ झाल्यावर देखील कुमारीआसव यकृताला अशाच पद्धतीने मदत करते,.यकृताचे स्त्राव वाढवून

४) रक्तशुद्धी साठी हे एक उत्तम औषध असून कोरफडीचा रस रोज एक चमचा आणि तेवढीच खडीसाखर साधारण एक महिना घेतला तर रक्तशुद्धी सोबत शरीरातली उष्णता कमी झालेली पाहायला मिळते.

५) स्त्रियांच्या गर्भाशयावर काम करणारी कोरफड : पाळी वेळेवर येत नसेल तर कोरफड एक उत्तम औषध असून ती गर्भाशय शुद्धी देखील करते , मात्र जास्त मात्रेत तिचे सेवन हानिकारक आहे , वैद्यकीय सल्ला अत्यंत आवश्यक ठरतो

६) पूर्वी बाळंत झाल्यावर नवजात अर्भकाचे पोट साफ व्हावे यासाठी कोरफडीचा रस , थेंबभर मध आणि तूप घालून देत असत, हल्ली सगळ्या maternity home मध्ये अशा गोष्टी जुनाट आणि अतात्त्विक मानल्या जातात … बाळाचे पोट साफ झाले नाही कि क्षारीय अशा साबणाच्या पाण्याचा एनिमा देऊन बालकांची पचन संस्था आयुष्यभरासाठी बाद केली जाते.

७) भाजले, पोळले कि कोरफडीचा गर तिथे बांधून ठेवावा, थंडावा मिळतो आणि आग कमी होते.

८) कोरफडीचा रस केसांसाठी उत्तम असून केस धुताना ताजा रस लावला असता केस मऊ आणि मुलायम आणि चमकदार होतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

सूचना : कोरफडीच्या अति सेवनाने मुळव्याध होऊ शकतो . रक्तस्त्रावाचे विकार असणार्यांनी , पाळीच्या वेळी जास्त स्त्राव होणाऱ्या स्त्रियांनी तिचे सेवन करू नये.