शिरुर तालुक्यात कार मध्ये गांजा बाळगणारा जेरबंद

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका कार मध्ये गांजा ठेवून फिरणाऱ्या कार चालकावर पोलिसांनी कारवाई करत कार सह गांजा जप्त करुन कार चालकावर गुन्हे दाखल करत अटक केली असून तेजस कुंडलिक भोगाडे असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस एस प्लाझा सोसायटी समोर एका राखाडी रंगाच्या कार मध्ये एक युवकाने गांजाची पिशवी ठेवली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस शिपाई लखन शिरसकर यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एम एच १२ आर टी २३४४ हि इको कार दिसून आली.

दरम्यान पोलिसांनी कार चालकाला बोलावत कारची पाहणी केली असता कारमध्ये एका पिशवीत गांजा ठेवल्याचे दिसून यावेळी पोलिसांनी कार चालकाकडे चौकशी केली काहीही माहिती मिळू शकली नाही, तर कार मध्ये पाऊण किलो गांजा मिळून आल्याने पोलिसांनी गांजा सह सदर कार जप्त केली.

याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र शिवाजी पानसरे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी तेजस कुंडलिक भोगाडे (वय ३०) रा. एस एस प्लाझा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. खरपुडी ता. खेड जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.

कार मध्ये गांजा आणून ठेवल्याची चर्चा…

शिक्रापूर पोलिसांनी कारवाई केलेल्या कार मध्ये आढळून आलेल्या गांजाशी कार चालकाचा काहीही संबंध नसून अन्य व्यक्तीने कार मध्ये गांजा ठेवून सकाळच्या सुमारास पोलिसांना माहिती देत कारवाई केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.