dhamni crime news

धामणी गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने मूळ मालकांना परत…

क्राईम

मंचर (कैलास गायकवाड): धामणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांनी केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

मौजे धामणी येथील गोविंद भगवंत जाधव (वय 82, राहणार धामणी धामणी फाटा पोंदेवाडी रोड ता. आंबेगाव जि. पुणे) यांच्या घरामध्ये घरगुती साहित्याचे कुपन विक्रीच्या बहाण्याने घरातील माहिती घेऊन 16/2/2023 रोजी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घराच्या दरवाजा तोडून व वृद्ध दापत्यांना कोयत्याने हातावर मारहाण करून व हात पाय बांधून जबरी चोरी करून निघून गेले होते. यामध्ये 55 हजार रुपये, त्यात बारा ग्रॅमची, 06 ग्रॅमची पिळ्याची ठशाची दोन अंगठ्या,1,00,000/₹ त्यात दोन पदरी छोट्या मन्याचे मंगळसूत्र, एक नाकातील सोन्याची नथ, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी असे एकूण 23 ग्रॅम सोने, व रोख पाच हजार रुपये असे एकूण एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

संबंधित गुन्ह्यातील आरोपींना एलसीबी व पारगाव पोलिस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करून अटक केली होती. अटकेनंतर चार आरोपींना
1) रवींद्र भाऊसाहेब फड वय वर्ष 31,
2) आकाश पांडुरंग फड वय वर्ष 26,
3) नंदकुमार रामा पवार वय वर्षे 21,
4) वैभव दिगंबर नांगरे वय वर्ष 19. सर्व रा. दरेकरवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर.
न्यायालय घोडेगाव यांच्यासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी रिमांड दिली होती. त्यादरम्यान म्हणजे दागिने व रोख रक्कम आता एकूण एक लाख 6o हजार रुपयाचा सर्व मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने 26/06/20 23 रोजी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते फिर्यादी यांना परत करण्यात आला.

सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व आरोपींनी रात्रीच्या वेळेस राहत्या घरात घुसून लाथा बुक्क्यांनी व कोयत्याने गंभीर मारहाण करून पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून पाठपुरावा केला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांना आव्हानात्मक होता. पारगाव कारखाना पोलिस स्टेशनचे तपाशी अंमलदार पो.स. ई लोकरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी प्रभारी अधिकारी सपोनि थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली केला. पोलिसांनी केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.