आमदार अशोक पवारांचे सुडाचे राजकारण

मुख्य बातम्या

ऊसतोडीसाठी आमदाबाद गावात टोळयाच दिल्या नाहीत

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावातील ऊसतोडीसंदर्भात घोडगंगा साखर कारखाना, न्हावरे सुडाचे राजकारण करीत असून आमदाबाद गावातून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांच्या पॅनलच्या विरोधात दोन उमेदवार उभे केले होते. त्याचा राग मनात धरुन या गावातील उसतोडीसाठी टोळ्याच पाठवल्या जात नसल्याचे आमदाबाद येथील शेतकरी सांगत आहे. त्यामुळे आमदाबाद येथील शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असून कारखान्याच्या मनमानी व चुकीच्या कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.

आमदाबाद येथील नागरीकांनी पॅनलच्या विरोधात उभे राहू नये म्हणुन आमदारांनी खुप प्रयत्न केले.परंतू केवळ विरोधात उभे राहील्याने सुडाची भावना मनात ठेवून ऊस तोड न केल्याने मोठा अन्याय येथील ऊसपिक घेतलेल्या सभासद शेतकऱ्यांवर होत आहे. रोग, अतिवृष्टीपासून जीवापाड जपलेला ऊस तुटत नसल्याने असंतोषाची भावना आमदाबाद येथील शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.

यापुर्वी गावामध्ये पाच – पाच टोळ्या ऊसतोडीसाठी येत होत्या. निवडणुकीत त्यांच्या विरोधात या गावातील उमेदवार आता जाणिवपुर्वक त्रास देवून शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेला जात नाही. येत्या चार दिवसात ऊसतोडीसाठी टोळ्या न दिल्यास सभासद शेतकरी घोडगंगा साखर कारखान्यापुढे आंदोलन ऊभारणार आहे.

अशोक माशेरे, आमदाबाद ग्रामस्थ

यावर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन ऋषिराज पवार यांनी सांगितले की, ऊस तोडण्याचा प्रोग्रॅम तारखेनुसार सुरु आहे. या हंगामात टोळया कमी आहे. केलेले आरोप हे बिनबुडाचे आहे.