pmpml-shirur

Shirur पर्यंत PMPML बस सुरू; पाहा वेळापत्रक…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके) शिरुरला पीएमपीएमएल बस सेवा सुरु करावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी, नागरिक व विविध संस्था संघटनांच्या वतीने मागणी होत होती. अखेर, पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि शिरूरमध्ये आज (शुक्रवार) पहिली बस दाखल झाली. यावेळी अनेकांनी बसचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

रांजणगाव ते शिरुरपर्यंत एस.टी. बस थांबत नसल्याने अनेकांची गैरसोय होत होती. याबाबत हजारो विद्यार्थ्यांचा पत्र व्यवहार, शिरूर पंचायत समिती, शिरूर नगरपरिषद, सरदवाडी ग्रामपंचायत, कर्डिलेवाडी ग्रामपंचायत, शिरूर ( रामलिंग ) ग्रामपंचायत आदींसह सी.टी.बोरा महाविद्यालय, सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, विद्याधाम प्रशाला शिरूर, न्यू इंग्लिश स्कूल शिरूर, भ्रष्टाचार मुक्त शिरुर अभियान, ग्राम स्वराज्य अभियान, मंगलमूर्ती स्वयंरोजगार सेवा स.संस्था, राष्ट्रीय किसान मजदूरी महासंघ आदींसह विविध संस्था संघटनांच्यावतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, शेतकरी संघटनेचे नितीन थोरात यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला पत्र देऊन कारेगावपर्यंत सुरू असलेली पीएमपीएल बस सेवा पुढे शिरूरपर्यंत सुरू करावी, अशी मागणी केली होती.

 

शिरुर शहरापासुन जवळ कारेगाव, रांजणगाव औद्योगिक वसाहत असून शिरुर परिसरातून वसाहतीत रोजगार व व्यवसायानिमित्त जाणा-यांची संख्या मोठी आहे. यात महिला कामगारांची संख्या ही मोठी आहे. कर्डे व सरदवाडी येथेही औद्योगिकरण जोर पकडत आहे. तसेच शिरुर पासुन सुपा एमआयडीसी ही तासाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे शिरुर शहरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण शहरीकरण होत असून शिक्षण व्यवसाय रोजगार व अन्य कामानिमित्त पुणे परिसर व पुणे नगर रस्त्यावरील विविध गावात जा ये करणा-यांची संख्या मोठी आहे .पुण्यात जाण्यासाठी आता एस टी बस बरोबरच पीएमपीएमएलच्या बससेवेच्या सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे .

pmpml-shirur-time-table

दरम्यान, अनेकांच्या मागणीची सकारात्मक दखल घेत आज सकाळी पहिली बस शिरूर शहरात दाखल झाली. तरी या पीएमपीएमएल बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घेण्याचे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी वाघोली पासून शिरुर पर्यत बसप्रवास करीत बससेवेचे स्वागत केले . बससेवा सुरु होण्यासंदर्भातील प्रवास ही त्यांनी स्वागतप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विशद केला. वाघोली बस डेपोचे मॅनेजर सोमनाथ वाघोले म्हणाले की गेल्या काही दिवसापासून शिरुर पर्यत बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार बससेवा सुरु करण्यात आली आहे. शिरुर बायपास ते शासकीय विश्रामगृहा पर्यत सहा थांबे आहेत. त्याच बरोबर दैनदिन पास ही उपलब्ध करुन देण्यात येतील व भविष्यात ही बसफे-या वाढविण्यात येणार असल्याचे वाघोले यांनी सांगितले. यावेळी बसचे चालक व वाहक संतोष लक्ष्मण वाघमारे ,भाउसाहेब मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड सुभाष पवार, माजी नगरसेवक नीलेश लंटाबळे , सामाजिक कार्यकर्ते नितीन थोरात, रवींद्र सानप आदीची स्वागतपर भाषणे झाली .

यावेळी दीपक गायकवाड ,माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, प्राचार्य अमोल शहा, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, नीलेश वाळूंज ,मुख्याध्यापक प्रकाश कल्याणकर, तुषार कुटे, रामलिंग महीला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, आदिशक्ती महिला मंडळ शशिकला काळे, उद्योजिका सविता बोऱ्हाडे, साधना सखी महासंघ साधना शितोळे, वैभवी महासंघ आशा पाचंगे, स्वाती थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील PMPML ची बससेवा होणार पूर्ववत

वाघोली ते शिरुर शहर बस सेवा सुरु करण्याची मागणी; राहुल पाचर्णे

तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू…