कोंढापुरीतील कंपनीत २२१ बाटल्या रक्तदानाचा विक्रम

शिरूर तालुका

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथील ग्लॅट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनीचे संस्थापक कै. वर्नर ग्लॅट यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल २२१ रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्त संकलनाचा विक्रम करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील ग्लॅट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनी कामगार कमिटी व स्पंदन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने कंपनीचे संस्थापक कै. वर्नर ग्लॅट यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने सध्याची रक्ताची आवश्यकता लक्षात घेत संजीवनी ब्लड बँक भोसरी व सूर्या ब्लड स्टोरेज सेंटर शिक्रापूर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

unique international school
unique international school

याप्रसंगी कंपनीचे एमडी राजीव भिडे, डायरेक्टर संदीप कुलकर्णी, जनरल मॅनेजर शोनिल बाकरे, भूषण सावंत, एच. आर. सत्यजित गायकवाड, हौशीराम इथापे, मोहन रोडगे, नारायण बोराडे, सुदिप मिश्रा, प्रवीण देशेट्टी, गणेश चव्हाण, धनराज बडे, संभाजी जाधव, संजय चव्हाण, भैरवनाथ काकडे, नामदेव संगापुडे, बापू पाटील, स्पंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजित करण्यात आलेल्या सदर रक्तदान शिबिरात सर्व कामगारांनी सहभाग घेतल्याने तब्बल दोनशे एकवीस पिशव्यांचे रक्त संकलित झाले, यावेळी संजीवनी ब्लड बँक भोसरीचे राहुल काटे यांसह आदींचे विशेष सहकार्य लाभले, तर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग घेतल्याने संकलित झालेल्या रक्त पिशव्यांचा विक्रम झाला असल्याचे स्पंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले, ग्लॅट कंपनीचे एच. आर. सत्यजित गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.