शिक्रापूरच्या तेवीस खेळाडूंचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या तब्बल 23 खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मधिल तायक्वांदो खेळामध्ये घवघवीत यश संपादित केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेत खेळातील क्योरुगी आणि पुमसे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यास्पर्धेमध्ये श्रेयस कर्डीले, अमन दहायत, जितेंद्र दहायत, संदेश मुरकुटे, रोहन खरात, सुशांक लेवरकर, श्रेयश सातारे, रोहन मोरे, अभिषेक नवले, ऋषिकेश पानसरे, यश नेमाडे, प्रतीक बिराजदार, यश अडसूळ, प्रणित हजारे, दया तांदळे, हर्ष पवार, आरयश पाटील, कृष्णा दिवेकर, इशिता तकटे, गीतांजली वेताळ, चैतन्य जाधव, सार्थिका शिंदे, मानसी शिंदे यांनी घवघवीत यश संपादित करत विविध पदके मिळवली आहेत, या सर्व खेळाडूंना ॲड. निखिल गिरमकर, स्वप्नील भिसे, रंजीत झा, संग्राम आजबे, दीक्षा वाडकर यांनी मार्गदर्शन केले.

सदर खेळाडूंच्या यशाबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच याबाबत बोलताना मुले व मुली स्वतःचे संरक्षण करु शकतील उद्देशाने तायक्वांदो प्रशिक्षण घेणे काळाची गरज असून तायक्वांदो मुळे मुलांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचे आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. निखिल गिरमकर यांनी सांगितले.