शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुवासिनींनी राजधानी दिल्लीत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): “वटपौर्णिमा” हा सण सर्वच सुवासिनीं महिलांसाठी महत्वाचा मानला जातो. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करतात. शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी या सर्व महिला सध्या देशाची राजधानी दिल्ली येथे गेलेल्या आहेत. आज (दि 3) रोजी  “वटपौर्णिमा” सणानिमित्त आपली मराठमोळी संस्कृती जपत या सर्व सुवासनीं महिलानीं दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्याच्या परिसरात वडाची पुजा करुन वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांच्या प्रयत्नाने संस्थेच्या वतीने या सर्व महिलांना पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत जाण्याची संधी मिळाली. सध्या या महिला दिल्लीत असुन आज (दि 3) रोजी दिल्ली येथे “वटपौर्णिमा” सणाच्या निमित्ताने शिरुर तालुक्यातील निमोणे गावाच्या माजी आदर्श सरपंच जिजाबाई दुर्गे तसेच श्रीगोंदा तालुक्यातील पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, देवदैठणच्या माजी आदर्श सरपंच मंगल कौठाळे, राजापुरच्या विद्यमान सरपंच प्रतीक्षा मेंगवडे, आरोग्य खात्याच्या आशा गुंड, निवृत्त शिक्षिका सुजाता रासकर या सर्व महिला सुवासिनींनी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करुन मराठमोळी संस्कृती जपत “वटपौर्णिमा” हा सण साजरा केला आहे.