body

कोरेगाव भीमात कंपनीचे पत्रे बसवताना पडून कामगार ठार

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी फोर्ज कंपनीत छताचे पत्रे बसवत असताना पत्रा तुटल्याने उंचावरुन पडून एका परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी फोर्ज कंपनीच्या शेडचे पत्रे दुरुस्त करण्याचे काम ओम एंटरप्रायजेस यांना देण्यात आलेले असल्याने ओम एंटरप्रायजेसचे कामगार मोहम्मद बिलाल, मोहम्मद नसीम व मोहम्मद हुसेन हे तिघे 8 जानेवारी रोजी सदर ठिकाणी उंचावरील पत्रे दुरुस्त करत नवीन पत्रे बसवण्याचे काम करत असताना साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोहम्मद नसीम यांच्या पायाखालील पत्रा तुटल्याने मोहम्मद नसीम हा तब्बल 35 फुट उंचीवरुन खाली पडल्याने जखमी झाला.

यावेळी कंपनीतील कामगारांनी जखमी मोहम्मद नसीम याला उचारासाठी सणसवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असताना डॉक्टरांनी मोहम्मद नसीम मोहम्मद अमीन अन्सारी (वय २८) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. बडोखर ता. कोरांव जि. प्रयागराज उत्तरप्रदेश याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

याबाबत मोहम्मद बिलाल मोहम्मद मीराबक्श (वय १९) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. बडोखर ता. कोरांव जि. प्रयागराज उत्तरप्रदेश यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.