vote

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी…

महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. राज्य निवडणुक आयोगाने यापूर्वीच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा बदल करण्यात आला आहे. शिवाय आता एका आठवड्यानंतर यावर सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाबद्दल स्थानिक पातळीवर पत्र व्यवहार झाला होता. त्याअनुशंगाने राज्य निवडणुक आयोगाने 5 जुलै रोजीच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार आज सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेला काही कालावधीसाठी ब्रेक लागला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य निवडणुक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाबद्दल पुढील सुवानीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत तारिख जाहीर झालेली नाहीतर न्यायालयाच्या पुढील सुनावणीनंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाणार आहे. पुढील सुनावणी ही आठवड्याभरानंतर होणार आहे.