शंकर जांभळकर यांची तब्बल १५ गावांमध्ये आरोग्यसेवा

दोन हजार पेक्षाही अधिक नागरिकांना व ज्येष्ठांना मिळाला लाभ

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील तब्बल १५ गावातील नागरिकांच्या आरोग्याचे हित ओळखून नुकतेच नेत्र तपासणी तसेच चष्मे वाटप आणि शस्त्रक्रिया शिबीर घेतले असून परिसरातील तब्बल २ हजार हून अधिका नागरिकांना याचा लाभ भेटला असल्याने माजी सभापती शंकर जांभळकर यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

शिक्रापूर: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील तब्बल १५ गावातील नागरिकांच्या आरोग्याचे हित ओळखून नुकतेच नेत्र तपासणी तसेच चष्मे वाटप आणि शस्त्रक्रिया शिबीर घेतले असून परिसरातील तब्बल २ हजार हून अधिका नागरिकांना याचा लाभ भेटला असल्याने माजी सभापती शंकर जांभळकर यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

शिरुर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना कोरोना काळामध्ये डोळ्यांच्या विविध समस्येंचा सामना करावा लागत असल्याची बाब शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजूबाजूच्या गावांमध्ये एच. वि. देसाई रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर सुरु केले. सदर शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार व शिरुर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे यांसह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सावकारकीला कंटाळून मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी

सदर शिबिराच्या माध्यमातून केंदूर, करंदी, धामारी, वाजेवाडी, मांजरेवाडी, पिंपळे जगताप, खैरवाडी, खैरनगर यांसह आदी गावातीन नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात आली असताना तब्बल ८०० नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले असून ६७० रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर शिबिराचा तब्बल दोन हजार पेक्षाही जास्त लोकांनी फायदा घेतला असताना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना हॉस्पिटलला जाणे अशक्य असल्याने नागरिकांना डोळ्यांच्या समस्येला गावातच उपचार मिळाल्याने अनेकांनी शंकर जांभळकर याचे आभार मानले.

आमदार अशोक पवार यांचे सणसवाडीत अनोखे स्वागत

शंकरामुळे मिळणार आम्हाला दृष्टी...
शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातील सहाशे सत्तर ज्येष्ठ नागरिक असलेल्या रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने यापैकी अनेकांना दृष्टी मिळणार असल्याने शंकरामुळे आम्हाला दृष्टी मिळेल असे असंख्य ज्येष्ठ नागरिक बोलत आहेत.

करंदीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा विसर...

महाआरोग्य शिबीर राबविण्याचा मानस; शंकर जांभळकर
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असताना नागरिकांना डोळ्यांव्यतिरिक्त अनेक समस्या असल्याचे लक्षात आलेले असून आपण पुढील काळात महाआरोग्य शिबीर राबवणार असल्याचे शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shankar Jambhalkar Yanchi Table 15 Village Health Service