शिरूर तालुक्यातील अजून एका मुन्नाभाईचा पर्दाफाश

शिक्रापुरात बनावट पद्धतीने सुरु होते कोविड केअर सेंटर

शिक्रापूर येथे बनावट पद्धतीने हॉस्पिटल चालवून कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मोरया हॉस्पिटल नावाने कोविड केअर सेंटर चालविणारा डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा शिक्रापूर येथे बनावट पद्धतीने हॉस्पिटल चालवून कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात प्रशासनाला यश आले आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हॉस्पिटलचे नाव आधार हॉस्पिटल असून, येथे रुग्णांना औषधोपचारासाठी देण्यात येणारी यादी मात्र साईधाम नावाने देण्यात येत असल्याचे अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून समोर आले आहे.

शिक्रापूरमध्ये कोविड सेंटर चालवणारा डॉक्टर निघाला बोगस

शिक्रापूर येथे आधार हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल सुरु करून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कोविड सेंटर उभारून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्या भीतीचा वापर करून रुग्णांना दाखल करून घेत बनावट पद्धतीने हॉस्पिटल सुरु असल्याची माहिती प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांनतर शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, तलाठी अविनाश जाधव, आशिष पवार, पोलिस शिपाई प्रफुल्ल सुतार, कृष्णा व्यवहारे यांसह आदींनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

बोगस डॉक्टर शंका येऊ नये म्हणून काय करायचा पाहा...

सदर हॉस्पिटल हे डॉ. निखील इंगळे यांच्या नावावर नोंदणी असून, येथील रुग्णांवर रामेश्वर बंडगर हा व्यक्ती उपचार करत असल्याचे तसेच या ठिकाणी सोळा रुग्ण उपचार घेत असून प्रत्येकाकडून सदर डॉक्टरने पन्नास हजार रुपये जमा करून घेतले होते. यापैकी फक्त पाच रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आलेली आहे तर अकरा रुग्णांचे फक्त स्क्यान करून दाखल करून घेतले असल्याचे समोर आले. मात्र, सदर ठिकाणी डॉ. निखील इंगळे नावाचा व्यक्ती कधीही आलेला नसल्याचे आजूबाजूचे नागरिक तसेच रुग्णांच्या नातेवाइकांकडून समजले.

कारेगावमधील डॉ. महेश पाटील या बोगस डॉक्टरचा प्रवास पाहा...

यावेळी प्रशासनाने येथील सर्व रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणच्या कोविड सेंटर मध्ये हलविले आहे. येथील रामेश्वर विठ्ठलराव बंडगर, गजानन विठ्ठलराव बंडगर, प्रशांत राजाराम मोरे, राहुल बाळासाहेब पवळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत बोलताना सदर प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर उशिरा पर्यंत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.

कारेगावमधील बनावट डॉक्टरचा आणखी एक 'प्रताप' उघडकीस

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

हॉस्पिटल आधार नावाने चिठ्ठी मात्र साईधाम नावाने...
शिक्रापूर येथे प्रशासनाने शुक्रवारी (ता. 23) केलेल्या कारवाईत हॉस्पिटलचे नाव आधार हॉस्पिटल असून, येथे रुग्णांना औषधोपचारासाठी देण्यात येणारी यादी मात्र साईधाम नावाने देण्यात येत असल्याचे अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून समोर आले आहे.

Image

पाच महिन्यांनापूर्वी याच डॉक्टरने केले होते खंडणीचे गुन्हे दाखल...
शिक्रापूर शिरूर येथे मागील पाच महिन्यांपूर्वी एका माजी सरपंचासह आदींवर खंडणी व अपहरण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना सदर हॉस्पिटल चालविणाऱ्या याच रामेश्वर बंडगर याने गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे सदर डॉक्टरच बोगस असून, त्याला नेमके कोणाचे अभय मिळत आहे? अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे.

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

Title: shikrapur bogus aadhar hospital covid center four arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे