शिक्रापूरच्या बोगस डॉक्टरचे पत्ते बोगस असल्याचा संशय

शिक्रापूर येथे प्रशासनाच्या वतीने बोगस हॉस्पिटलवर छापा टाकत कारवाई केली. तेथील रुग्ण इतर हॉस्पिटल मध्ये हलवून बनावट पद्धतीने हॉस्पिटल चालविणाऱ्या डॉक्टरला ताब्यात घेतले.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथे दोन दिवसांपूर्वी कोणताही परवाना नसताना हॉस्पिटल उभारून त्याठिकाणी कोविड सेंटर चालवून त्यामाध्यमातून कोरोना बाधितांवर उपचार केले जात होते. प्रशासनाच्या वतीने कारवाई करत बोगस डॉक्टर वर गुहे दाखल करण्यात आले असून, हॉस्पिटल सील करण्यात आले. मात्र सदर बोगस डॉक्टरचे पत्ते बोगस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

शिक्रापूरमध्ये कोविड सेंटर चालवणारा डॉक्टर निघाला बोगस

शिक्रापूर येथे प्रशासनाच्या वतीने बोगस हॉस्पिटलवर छापा टाकत कारवाई केली. तेथील रुग्ण इतर हॉस्पिटल मध्ये हलवून बनावट पद्धतीने हॉस्पिटल चालविणाऱ्या डॉक्टरला ताब्यात घेतले. शिवाय, चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींपैकी मूळ डॉ. रामेश्वर बंडगर या डॉक्टरने यापूर्वी शिक्रापूरच्या माजी सरपंचांवर गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी त्याने दिलेल्या फिर्यादीमध्ये त्याने त्याचे पूर्ण नाव व पत्ता हे रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय २८, रा. शेखर हाईट्स माळी मळा, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे. मूळ रा. धानोरा ता. उमरखेड जि. यवतमाळ) असे दिले होते. मात्र सध्या सदर बोगस डॉक्टर रामेश्वर बंडगर यास पोलिसांनी अटक केली असताना त्याने त्याचे पूर्ण नाव व पत्ता हा रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय २८, सध्या रा. ज्ञानमंजुळा सोसायटी, तळेगाव ढमढेरे रोड, शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे. मूळ रा. शेलू बुद्रुक ता. पुसद जि. यवतमाळ) असा दिला आहे.

बोगस डॉक्टर शंका येऊ नये म्हणून काय करायचा पाहा...

शिक्रापूर परिसरात सदर बोगस डॉक्टर भाडेतत्वावर राहत असल्याने त्याचा येथील पत्ता बदलू शकतो. मात्र, मूळ गावाकडील पत्ता मात्र बदलू शकत नाही. सदर हॉस्पिटलवर कारवाई दरम्यान हॉस्पिटलचे नाव 'आधार हॉस्पिटल' होते. पण, रुग्णांना मेडिकल यादी देण्यासाठी वापरण्यात येणारी कागदे साईधाम नावाने देत होता. त्यामुळे मोठा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, सदर बनावट डॉक्टर नेमका करतो तरी काय? त्याचे ओळखपत्र यांसह इतर कागदपत्रे तर बोगस नाहीत ना? असा सवाल सर्वांना पडला आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

कारेगावमधील डॉ. महेश पाटील या बोगस डॉक्टरचा प्रवास पाहा...

याबाबत शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधला असतान सदर गुन्ह्यामध्ये डॉ. रामेश्वर बंडगर, डॉ. निखील इंगळे, डॉ. विजय डोईफोडे, डॉ. घाटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी रामेश्वर बंडगर यास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असून, सदर कालावधीत त्याच्याकडून त्याचे ओळखपत्र जप्त करण्यात येणार आहे. त्यावेळी कागदपत्रांची चौकशी केली जाईल, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

कारेगावमधील बनावट डॉक्टरचा आणखी एक 'प्रताप' उघडकीस

हॉस्पिटल मधील इतर आरोपींचे काय ?  
शिक्रापूर येथील हॉस्पिटल वर करवाई करण्यात आली, त्यावेळी येथील रामेश्वर विठ्ठलराव बंडगर, गजानन विठ्ठलराव बंडगर, प्रशांत राजाराम मोरे, राहुल बाळासाहेब पवळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र गुन्हे दाखल करताना इतर आरोपींवर गुन्हे दाखल केले व इतर आरोपींना काही तडजोड करून सोडून दिल्याची चर्चा शिक्रापुरात सुरु झाली आहे.

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

Title: shikrapur bogus aadhar hospital doctor bougs address police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे