शिक्रापूरचे पोलिस शिपाई अंबादास थोरे यांचा विशेष सन्मान

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार मदतनीस पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे घेऊन जात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांशी फोनवर संपर्क साधला होता.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मृत्यू झालेल्या परप्रांतीय व्यक्तीचे नातेवाईक दुसऱ्या राज्यात असल्याने अंत्यविधीसाठी कोणीही उपलब्ध होऊ शकत नसल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी सदर व्यक्तीचा अंत्यविधी केला. याबाबतचे वृत्त www.shirurtaluka.com ने प्रसिद्ध केल्यानंतर थोरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिक्रापूरमध्ये घडले खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका गावात बुधवारी (ता. २८) एका परप्रांतीय चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार मदतनीस पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे घेऊन जात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांशी फोनवर संपर्क साधला होता.

रांजणगाव एमआयडीसी मध्ये जबरी चोरी करणारा जेरबंद

दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच हजर नव्हते. यावेळी पोलिस शिपाई अंबादास थोरे यांच्या समोर प्रश्न उभा राहिला होता. त्यांनी सदर मृताच्या नातेवाइकांशी संपर्क साधला तर त्यांनी साहेब आम्ही दुसऱ्या राज्यात आहे, सध्या कोरोनाचा काळ त्यात तिकडे येण्याच्या मोठ्या अडचणी असल्याने तुम्ही तिकडे अंत्यविधी करून आम्हाला व्हिडीओ कॉलवर अंतिम दर्शन द्या अशी विनंती केली असता अंबादास थोरे यांनी क्षणाचाही विचार न करता शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घेत स्मशानभूमीत अंत्यविधी केला.

शिरूर तालुक्यातील गावामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

याबाबतची माहिती प्रसारित झाल्याने अनेकांनी अंबादास थोरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिरूर तालुका रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांच्या वतीने पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांच्या हस्ते अंबादास थोरात यांचा सन्मान करण्यात आला असून, अनेक स्तरातून थोरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

'शिक्रापूरमधील तावसकर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न'

Title: shikrapur police constable ambadas thore funeral later socia
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे