शिक्रापूरमध्ये घडले खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...

घरच्यांनी अंत्यविधी नाकारला असताना पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी मृतदेहाला अग्नी देत अंत्यविधी केला. खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन शिक्रापूरमध्ये घडले आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीचा मृत्यू झाला, यावेळी पोलिस स्टेशन मध्ये हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने सदर व्यक्तीचा मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन झाले मात्र मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यास कोणीच तयार होत नव्हते. घरच्यांनी अंत्यविधी नाकारला असताना पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी मृतदेहाला अग्नी देत अंत्यविधी केला. खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन शिक्रापूरमध्ये घडले आहे.

पुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये बुधवारी (ता. 28) घडलेल्या एका घटनेत चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार दत्तात्रय बनकर व मदतनीस पोलिस शिपाई अंबादास थोरे असताना अंबादास थोरे यांनी सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे पाठवून दिला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांशी फोनवर संपर्क साधत सर्व माहिती दिली.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

उमेश तावसकर यांच्या विरोधात आता खंडणीची तक्रार

दरम्यान, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वैजनाथ काशीद यांनी सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करून दिले. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच हजर होत नव्हते. यावेळी पोलिस शिपाई अंबादास थोरे यांच्या समोर प्रश्न उभा राहिला. त्यामुळे त्यांनी सदर व्यक्तीच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्यांनी 'साहेब आम्ही दुसऱ्या राज्यात आहे, सध्या कोरोनाचा काळ त्यात तिकडे येण्याच्या मोठ्या अडचणी तुम्हीच आमचा मुलगा आहात या हेतूने तुम्ही तिकडे अंत्यविधी करा. आम्हाला व्हिडिओ कॉल करून आमच्या माणसाने अंतिम दर्शन द्या,' अशी विनंती केली.

तावसकर, सासवडेंच्या आखाड्यात भाऊसाहेब आंधळकरांची 'इंट्री'

यावेळी अंबादास थोरे यांनी देखील क्षणाचा विचार न करता याला होकार देत सदर व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सदर व्यक्तीवर शिक्रापूर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, बबलू शेख, पप्पू चव्हाण, सिकंदर शेख यांचे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी सांगितले. मात्र, पोलिस शिपायाकडून घडलेल्या अनोख्या प्रकारातून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडले आहे.

शिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shikrapur police constable ambadas thore funeral person his
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे