शिक्रापूरच्या पोलिस निरीक्षकाची निलंबनाची मागणी; अन्यथा...

शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी गलिच्छ भाषेचा वापर करत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी पोलिस स्टेशनला हजेरी सुरु असताना शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या माजी सरपंच तसेच पोलिस कर्मचाऱ्यास गलिच्छ भाषेचा वापर करत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माजी सरपंचानी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.

बापरे! शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकाची अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी चार दिवसांपूर्वी पोलिस स्टेशन येथे पन्नास हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांची हजेरी घेत असताना शिक्रापूरचे माजी आदर्श सरपंच रामराव सासवडे यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांबाबत गलिच्छ भाषेचा वापर केला. शिवाय, खुनाची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी अतिशय खालच्या पातळीचा वापर पोलिस निरीक्षक तावसकर यांनी केला आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिक्रापूरमध्ये शिवसेना माजी उपतालुका प्रमुखाचा बार सील...

दरम्यान, पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांबाबत देखील असेच वर्तन केले आहे. याबाबतची ऑडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. माजी सरपंच रामराव सासवडे यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते यांसह काही मंत्र्यांकडे तक्रार करत याबाबत पुरावे देखील सादर केले आहेत. परंतु, सदर प्रकारची कुणकुण लागताच पोलिस निरीक्षक यांच्याकडील पोलिस स्टेशनचा पदभार पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याकडे देण्यात आला आहे. परंतु, सदर तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा एक मे रोजी शिक्रापूर पोलिस स्टेशन समोर ग्रामस्थांसह, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने उपोषण करण्यात येणार असल्याचे पत्र शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने पोलिस स्टेशन तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आले आहे.

शिरूर तालुक्यातील अजून एका मुन्नाभाईचा पर्दाफाश

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख
शिक्रापूर येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या घडलेल्या या प्रकाराच्या तक्रारी बाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, सदर पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्यात आलेली सदर प्रकरणाची चौकशी लावण्यात आलेली असल्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

शिरूर तालुक्याचे सुपुत्र रमेश धुमाळ यांना बढती

Title: shikrapur police inspector umesh tawaskar demand action vide
प्रतिक्रिया (1)
 
Akash parhad
Posted on 2 May, 2021

Join

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे