Shikrapur Police: शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची कारवाईस टाळाटाळ...?

कारवाई न झाल्यास पुन्हा आत्मदहन करण्याचा अशोक भोरडे यांचा इशारा

तळेगाव ढमढेरे येथील शासकीय धान्य गोदामातून चार वाळुच्या (Valu) गाड्या चोरी गेल्याची तक्रार मंडलाधिकारी आळणे यांनी सन २०२० ला दिली होती. त्यानंतर काही गाडी मालकांना या गुन्ह्यांमध्ये अटक (arrest) करण्यात आली. त्यानंतर एका शासकीय (official) अधिकाऱ्याविरुद्ध वाळू वाहन मालकांनी सत्य प्रतिज्ञापत्र दिले होते. त्या अनुषंगाने त्या महसूल अधिकाऱ्याविरुद्ध (Officer) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी खुलासा (reveal) मागितला होता. त्या अधिकाऱ्याने स्वहस्ताक्षरात वरिष्ठांना लेखी खुलासा देऊन एक वर्ष उलटूनही अजुनही महसूलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याने कारवाई कधी होणार...? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

शिरुर: तळेगाव ढमढेरे येथील शासकीय धान्य गोदामातून चार वाळुच्या (Valu) गाड्या चोरी गेल्याची तक्रार मंडलाधिकारी आळणे यांनी सन २०२० ला दिली होती. त्यानंतर काही गाडी मालकांना या गुन्ह्यांमध्ये अटक (arrest) करण्यात आली. त्यानंतर एका शासकीय (official) अधिकाऱ्याविरुद्ध वाळू वाहन मालकांनी सत्य प्रतिज्ञापत्र दिले होते. त्या अनुषंगाने त्या महसूल अधिकाऱ्याविरुद्ध (Officer) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी खुलासा (reveal) मागितला होता. त्या अधिकाऱ्याने स्वहस्ताक्षरात वरिष्ठांना लेखी खुलासा देऊन एक वर्ष उलटूनही अजुनही महसूलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याने कारवाई कधी होणार...? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

 किरकोळ वादातून शेतकऱ्यास मारहाण

मंडलाधिकारी यांच्या अर्जा नंतर काही दिवसांनी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी उपविभागीय अधिकारी पुणे यांच्या कार्यालयांमध्ये याविषयी माहिती अधिकारात माहिती मागवली असता त्यांना लेखी माहिती देण्यात आली. त्यामध्ये एका नायब तहसिलदारांनी स्वहस्ताक्षरात दिलेली लेखी माहिती समोर आली. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उजेडात आला .या वाळूच्या गाड्या चोरीला गेल्याची तक्रार तळेगाव ढमढेरे येथील मंडळ अधिकारी यांनी दिली होती प्रत्यक्षात या गाड्या चोरी गेल्या नसून त्या गाड्या आर्थिक तडजोड करून सोडण्यात आलेल्या होत्या. यामध्ये काही महसूल अधिकारी ,काही खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याचे दिसून आले त्यानंतर अशोक भोरडे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या निदर्शनास ही धक्कादायक बाब आणून दिली व त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना पोलीस अधीक्षक यांनी आदेश देऊन याबाबत सखोल तपास करण्यास सांगितले.

शिरुर तालुक्यातील महिलेसह महिलेच्या कुटुंबियांना मारहाण

शासकीय फिर्याद खोटी ठरत आहे असे निदर्शनात आले असुन काही प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे हि आर्थिक तडजोड कोणी केली, वाळूच्या गाड्याचे पैसे कोणी स्वीकारले, कोणाच्या सांगण्यावरुन आणि कोणत्या महसूल अधिकारी यांच्यासाठी स्वीकारले याचा लेखी जबाब झाल्याची खात्रीलायक माहिती "शिरुर तालुका डॉट कॉम" ला प्राप्त झाली आहे एक नायब तहसीलदार व साक्षीदारांचा लेखी जबाब शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी नोंदवला असून अद्यापही शिक्रापूर पोलीस स्टेशन या गुन्ह्यातील खरे आरोपी निष्पन्न होऊन सुद्धा खऱ्या आरोपींवर कारवाई करत नाही. जर सामान्य व्यक्तींनी हा गुन्हा केला असता तर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करत लगेचच गजाआड केले असते.

ग्रामपंचायतमध्ये क्रिकेट मैदानावरुन खडाजंगी

परंतु या गुन्ह्यात शासकीय लोकसेवक यांचा सहभाग आहे हे पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो आहे की काय अशी जोरदार चर्चा प्रशासनामध्ये व नागरीकांमध्ये रंगली असुन या आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई का केली जात नाही तसेच त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे हे २६ नोंव्हेंबर रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहे. त्याबाबतचे लेखी पत्र पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि इतर अधिकाऱ्यांना दिले आहे. याबाबत शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की  सदर गुन्ह्यांमध्ये अद्याप तपास चालू असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई होईल. 

Title: Shikrapur Police Station What is the maximum action taken by