शिक्रापूर च्या युवकाची शेअरमार्केटच्या आमिषाने फसवणूक

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या एका युवकाला अज्ञात व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंताविण्याच्या आमिषाने चक्क पावणे ४ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या एका युवकाला अज्ञात व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंताविण्याच्या आमिषाने चक्क पावणे ४ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विलास बाविस्कर यांना मार्च २०२१ मध्ये काही मोबाईल नंबरवर फोन आला व तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ, असे आमिष दाखवून बाविस्कर यांना काही खात्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. दरम्यान बाविस्कर यांना प्रथम ३ हजार ६०० रुपयांचा परतावा देखील दिला. मात्र त्यांनतर बाविस्कर यांना वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार बाविस्कर यांनी वेळोवेळी ३ लाख ७७ हजार रुपये बँक खात्यामध्ये पाठविले. परंतु त्यांनतर समोरील व्यक्तींचा फोन देखील आला नाही. तसेच काहीही संपर्क झाला नसल्याने आपली शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक झाली असल्याचे बाविस्कर यांच्या लक्षात आले.

शिरुरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार लैला शेख आता गप्प का?

याबाबत विलास दिनकर बाविस्कर रा. मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. दाम्बुर्णी ता. यावल जि. जळगाव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवदास खाडे हे करत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shikrapur youth cheated by stock market lure
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे