शिक्रापूरात तक्रार निवारणदिनी १२५ तक्रारींवर कार्यवाही

दहा लाखांचा चोरीतील मुद्देमाल मूळ मालकांना परत

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले असताना तब्बल १२५ तक्रारी अर्जांवर कार्यवाही कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षण हेमंत शेडगे यांनी दिली आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले असताना तब्बल १२५ तक्रारी अर्जांवर कार्यवाही कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षण हेमंत शेडगे यांनी दिली आहे.

शिक्रापूरच्या आयानने साकारला इको फ्रेंडली बाप्पा...

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतेच तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते, यावेळी पोलीस स्टेशन तसेच वरिष्ठ कार्यालय येथे तक्रार केलेली तक्रारदारांना बोलाविण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, विक्रम साळुंके, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, किशोर तेलंग, राजेंद्र बनकर, महिला पोलिस उज्वला कदम यांसह आदी उपस्थित होते, यावेळी तब्बल ऐंशी तक्रार अर्जदार तक्रार निवारण दिनासाठी उपस्थित होते.

शिक्रापूर ते वाघाळे रस्त्याचे काम अतिनित्कृष्ठ; कारवाईची मागणी...

यावेळी चोरीच्या गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेले आहे काही वाहने, मोबाईल, रोख रक्कम असा दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांना परत करण्यात आला आहे, तर आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनामध्ये दिवसभर तब्बल १२५ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shikrapurat dispute preventiondini 125 disputed action