बोगस डॉक्टर शंका येऊ नये म्हणून काय करायचा पाहा...

नांदेडमधील मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असे वाटले की....

शिरूरः कारेगाव (ता. शिरूर) येथे गेल्या दोन वर्षांपासून हॉस्पिटल चालवणारा बोगस डॉक्टर चक्क बारावी नापास होता. पण, श्री मोरया मल्टी स्पेशालिटी नावाने तब्बल 22 बेडचे हॉस्पिटल तो चालवत होता. नाव बोगस, पदवी बोगस असतानाही तो रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. मेहमूद शेख असे त्याचे नाव.

कारेगावमधील डॉ. महेश पाटील या बोगस डॉक्टरचा प्रवास पाहा...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहमूद शेख हा डॉ. महेश पाटील या नावाने तो हॉस्पिटल चालवत होता. आपली ओळख पटू नये म्हणून तो नेहमी रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात जात होता. आपला बोगसपणा कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तो नेहमी सोबत कोणाला तरी घेऊन महागणपती मंदिरात दर्शनासाठी जायचा. शिवाय, तेथे गेल्यानंतर बहुतांश वेळ घालवायचा. यामुळे कोणाला शंका येत नव्हती. डॉ. महेश पाटील हा बोगस डॉक्टर नेहमी महागणपती मंदिरात असल्यामुळे त्याच्या नावाविषयी सुद्धा कोणाला शंका नव्हती. पण, मंदिरात येण्यामागे त्याचा उद्देशच वेगळा होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याचे वेगवेगळे प्रताप उघडकीस येत आहेत.

कारेगावमधील बनावट डॉक्टरचा आणखी एक 'प्रताप' उघडकीस

नांदेडमधील मेहमूद शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असे वाटले की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी श्री मोरया मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरु केले. त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि नावही बदलले. दोन वर्षे तो रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. अखेर, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, सोमवारपर्यंत (ता. 19) त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या वतीने वकील किरण रासकर हे काम पाहात आहेत.

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

दरम्यान, बोगस डॉक्टरने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. मात्र, त्याने उपचार करताना केलेली लुटालूट रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर आणणारी आहे. यातल्या काही नातेवाईकांनी आपला अनुभव सांगितला. सध्या हा मुन्नाभाई पोलिसांच्या ताब्यात आहे. या बारावी नापास मेहबूबला डॉ. महेश पाटील बनण्यासाठी कुणी मदत केली याचा पुढील शोध पोलिस घेत आहेत.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

...अन् शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्याची झाली बोलती बंद!

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

Title: shirur crime news bogus doctor dr mahesh patil ranjangaon vi