Shirur: शिरुरच्या शिक्षकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब

शिक्रापूर (Shikrapur)सह शिरुर तालुक्यातील २ शिक्षकांनी चक्क आंबेगाव (Ambegaon)तालुक्यातील अतिदुर्गम भागांमधील आडिवरे, पंचाळे व पसारवाडी या गावात जात, शालेय विद्यार्थ्यांना (students) स्वखर्चाने उबदार कपड्यांचे वाटप करत आदिवासी विद्यार्थ्यांना मायेची ऊब दिली आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (Shikrapur)सह शिरुर तालुक्यातील २ शिक्षकांनी चक्क आंबेगाव (Ambegaon)तालुक्यातील अतिदुर्गम भागांमधील आडिवरे, पंचाळे व पसारवाडी या गावात जात, शालेय विद्यार्थ्यांना (students) स्वखर्चाने उबदार कपड्यांचे वाटप करत आदिवासी विद्यार्थ्यांना मायेची ऊब दिली आहे.

'त्या' विमा कंपन्यांवर अजित पवार संतापले म्हणाले...

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक राहुल चातूर व शिरुर शिक्षक पतसंस्थेचे संचालक कल्याण कोकाटे या २ शिक्षकांनी हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीची तीव्रता जाणवू लागल्याने दुर्गम भागातील मुलांना ऊबदार रजई, सोलापुरी चादर व कानटोपी वितरीत करून थंडीपासून त्यांचे संरक्षण करण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. शिक्षकांकडून मायेची ऊब फाउंडेशन मार्फत सहा वर्षांपासून जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये हा स्तुत्य उपक्रम सुरू असून आडिवरे येथील शाळेत पार पडलेल्या या उपक्रमाचा ४९ विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. यावेळी तंत्रस्नेही शिक्षक खंडेराव होळकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

Reshning: रेशनबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

याप्रसंगी केंद्रप्रमुख म्हातरबा कोंढवळे, माजी सभापती संजय शेळके, सरपंच मारूती जढर, शाळा समिती अध्यक्ष काळू जढर, पुनाजी तिटकारे, सुरेश किर्वे, शिक्षक मच्छिंद्र झांजरे, अशोक किर्वे, दत्तात्रय अहिरे, दिनेश वैष्णव, रूपाली लाळगे, सोमनाथ एरंडे, श्वेता चिखले यांसह आदी उपस्थित होते. शिरुर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर व आंबेगावचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी या विधायक उपक्रमाचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur Shirurchaya teacherankadoon tribal student milali ma