शिक्रापूर-चाकण रस्त्यावर विचित्र अपघात...

सणसवाडी येथील एका कंपनीचा माल घेऊन पिक अप चालक शंकर वानखेडे या त्याच्या ताब्यातील एम एच १२ जि टी ५५६९ हि पिक अप घेऊन चाकण दिशेने चालले होते.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर-चाकण रस्त्यावर टेम्पो व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातात पिकअप चालक शंकर वानखेडेसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यात महिलेला धमकी देत चित्रीकरण करत बलात्कार

शिक्रापूर येथील शिक्रापूर-चाकण रस्त्याने सणसवाडी येथील एका कंपनीचा माल घेऊन पिक अप चालक शंकर वानखेडे या त्याच्या ताब्यातील एम एच १२ जि टी ५५६९ हि पिक अप घेऊन चाकण दिशेने चालले होते. केवटे मळा येथे चाकण बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ डी एम १४४८ या टेम्पो चालकाचा समोरील वाहनाला ओहरटेक करत असताना पिकअपला समोरून जोरदार धडक बसली. यावेळी पिकअप चालक शंकर वानखेडे (रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे) हा गंभीर जखमी झाला तर पिकअप मध्ये बसलेले मेघा गरुड व संजय गरुड हे दोघे देखील किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Video: पुणे-नगर महामार्गावर पाणी तुंबल्याने वाहतूककोंडी...

याबाबत अमित ज्ञानेश्वर मिडगुले (वय ३६ वर्षे रा. मिडगुल वाडी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राकेश मळेकर हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात घरी आलेल्या सासऱ्याला जावयाकडून मारहाण

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka accident news shikrapur chakan road accident