आजचा वाढदिवसः किरण पिंगळे

www.shirurtaluka.com च्या उपसंपादिका किरण पिंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

काही व्यक्तींच्या आयुष्यात पदोपदी संघर्ष असतो. पण, कष्टाच्या जोरावर आणि मेहनतीने ते पुढे जात असतात. रांजणगाव गणपती येथील किरण पिंगळे या सुद्धा जिद्दीच्या जोरावर यश संपादन करत आहेत.

आयुष्यात आई-वडिल यांचे असणं खूप महत्वाचं असते. पण वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचे वडिलांचे छत्र हरपले. आई वंदना खचून न जाता मोलमजुरी करत किरण यांना १० वी पर्यंतचे शिक्षण दिले. परंतु, परीस्थिती अभावी दहावीतूनच शिक्षण सोडावे लागले. शिक्षण थांबले तरी नवीन काही शिकण्याची जिद्द कायम होती.

किरण पिंगळे यांनी २०१९ साली www.shirurtaluka.com मध्ये पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. वेबसाईटच्या बातम्या संपादन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. काही दिवसातच बातम्यांसह सोशल मीडियाचे ज्ञान अवगत केले. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांना उपसंपादक म्हणून निवड झाली. शिवाय, www.shirurtaluka.com च्या YouTube चॅनल ला निवेदक म्हणूनही त्यांनी काम सुरु केले असून, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

किरण पिंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Title: shirur taluka celebrate journalist kiran pingle birthday
प्रतिक्रिया (1)
 
Kisan Gaware
Posted on 30 June, 2021

किरण पिंगळे मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.पुढील कार्यास शुभेच्छा..