आजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर

शुभेच्छ:- शिरुर तालुका डॉट कॉम टिम

शिरुर तालुक्यातील वाघाळे या गावचे सुपुत्र श्री. संतोष प्रभू धायबर गेली २३ वर्षे पत्रकारीतेत आहेत. दैनिक 'सकाळ'मध्ये ते वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत होते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या  www.shirurtaluka.com या संकेतस्थळाची निर्मिती पत्रकार संतोष धायबर यांनी केली आहे. २६ मे २०११ रोजी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबईत विधानसभा येथे   संकेतस्थळाचे उद्घाटन  करण्यात आले होते.

सध्या संतोष धायबर हे  www.policekaka.com या संकेतस्थळाचे संपादक म्हणून काम पाहात आहेत. धायबर यांनी विविध विषयांवर सातत्याने लिखान केले असून, त्यांची दोन पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांचे अनेक लेख तसेच बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी विविध विषयांवर ब्लॉग लिहीले आहेत. शिवाय, स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन वार्तांकन केले आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेले जवान चंदू चव्हाण यांची सर्वप्रथम मुलाखत श्री. संतोष धायबर यांनी घेतली होती. "दैनिक सकाळ" मधून ती मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर देशभर गाजली होती. श्री. धायबर यांनी जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे ३ महिने २१ दिवस) हे पुस्तक लिहिले आहे.

Title: shirur taluka celebrate Santosh Dhaybar birthday
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे