आजचा वाढदिवस:- तेजस फडके

शुभेच्छुक:- शिरुर तालुका डॉट कॉम टीम

शिरुर तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या शिंदोडी या गावात १६ मार्च १९८२ रोजी तेजस फडके यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ह.भ.प रामदास महाराज फडके हे किर्तनकार आहेत.

तेजस फडके यांचं प्राथमिक शिक्षण पुणे येथील नवभारत हायस्कुल शिवणे येथे झाला. त्यानंतर ७ वी मध्ये ते निमोणे येथील नागेश्वर विद्यालयात दाखल झाले. शालेय वयातच त्यांच्या अंगी वक्तृत्व कला होती. शाळेत असताना ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत होते. त्यांना लहानपणापासुन सामाजिक कार्याची आवड होती.

२००८ साली त्यांनी दैनिक पुढारी या वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर २०१० साली दैनिक प्रभात आणि २०११ साली राज्यातील पहिली न्यूज वेबसाईट असणाऱ्या www.shirurtaluka.com या वेबसाईटला प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम सुरु केलं. २०१५ ला विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांना बढती मिळाली. त्यांनी समाजातील अनेक चुकीच्या गोष्टींवर निर्भीडपणे सतत लिखाण केले. त्यांची शिरुर तालुक्यात धाडसी, निर्भीड आणि निपक्ष पत्रकार म्हणून ओळख आहे. त्यांच्या या चांगल्या कामाची पावती म्हणून २०२० रोजी त्यांची www.shirurtaluka.com च्या मुख्य संपादक पदी निवड करण्यात आली.

Title: shirur taluka celebrate Tejas Phadke birthday
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे