दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने मलठण गहिवरले...

दोन्ही देव चोरीला गेले हो, त्यांना कुठे शोधू...

आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो, त्यांना कुठे शोधू ? हा वृद्ध मातापित्याचा टाहो आसमंतात विरून गेला.

शिक्रापूर: मलठण (ता. शिरुर) येथील विशाल कृष्णकांत गायकवाड व तुषार कृष्णकांत गायकवाड हे दोघे सख्खे भाऊ यापैकी विशालचा २२ एप्रिल रोजी तर तुषारचा मृत्यू ३ मे रोजी बरोबर दहा दिवसांत दोन्ही सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने संपूर्ण गाव गहिवरले असून, गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

मलठण येथील कृष्णकांत गायकवाड (वय 62) आणि त्यांच्या पत्नी मंगल कृष्णकांत गायकवाड (वय 53) दोघांच्या म्हातारपणी डोळ्यांदेखत उध्वस्त झालेला संसार पाहून शून्यात नजर लावून बसले आहेत. आमचा देव चोरीला गेला हो... असे म्हणून जेव्हा टाहो फोडला तेव्हा काळही क्षणभर थांबला असेल.

शिरूर तालुक्यातील ६३ गावात कोरोनाचे किती रुग्ण पाहा...

सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना शिरूर तालुक्यातील मलठण येथे घडली असून बघता बघता एक संसार धुळीला मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील सूर्या सांगवी या मुळ गावातील कृष्णकांत गायकवाड व मंगल गायकवाड यांचे कुटुंब उदर निर्वाहासाठी मलठण येथे आले होते. मोलमजुरी करीत प्रामाणिकपणे संसाराचा गाडा ओढत होते. विशाल, सागर, प्रियांका व तुषार ही मुले. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मुले मोठी झाली. विशाल याने दहावी तर तुषार याने हिंदी विभागातून एम.ए. चे शिक्षण घेतले होते.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनकच...

नोकरीच्या शोधात निराश झाल्यावर विशाल व तुषारने मलठण येथेच शौर्य कॉम्पुटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून व्यवसाय उभा केला. अतिशय मनमिळाऊ स्वभाव, गरिबीची जाणीव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसाय भरभराटीला आला असताना मधल्या काळात विशाल, सागर आणि प्रियांका यांची लग्न झाली. तुषार अविवाहित होता. परंतु या वर्षी त्याचे देखील लग्न जुळून येत होते. पण याचवेळी नियती या आदर्श कुटुंबाशी निर्दयपणे एक डाव खेळत होती.

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका या कुटुंबाला बसला. विशालला कोरोनाची लागण झाली. परंतु, दुर्दैवाने त्यावर दुर्लक्ष झाले आणि आजार अंगावर काढला, त्याची परिणती म्हणून २२ एप्रिलला विशालचा मृत्यू झाला. त्याचे सर्व अंत्यसंस्कार तुषारने केले आणि दोन दिवसात तुषार देखील कोरोनात पॉझिटिव्ह आला. त्याला त्रास होऊ लागल्याने तुषारला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, ऑक्सिजन कमी आल्याने दहा दिवस त्यानेही मृत्यूशी झुंज दिली.

May be an image of text

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक मित्रमंडळींना निधी जमविला व त्याला मानसिक व आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. अखेर मृत्यूशी झुंज देताना तुषारनेही हार पत्करली आणि ३ मे च्या पहाटे तोही अनंताच्या प्रवासाला निघून गेला. यावेळी आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो, त्यांना कुठे शोधू ? हा वृद्ध मातापित्याचा टाहो आसमंतात विरून गेला.

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka corona news malthan two brother passes away
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे