पाबळ मध्ये पोलिसांत तक्रार केल्याने महिलेला मारहाण

पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरूर) येथील महिलेने पतीकडून होत असलेल्या त्रासाबाबत पोलिसांत तक्रार केल्याने महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे निलेश राजू शेलार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर विचित्र अपघात...

पाबळ येथील प्रेमा शेलार या महिलेला तिचे पती निलेश यांच्याकडून त्रास होत असल्याने तिने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार केली होती. मात्र, पत्नीने आपल्या बाबत तक्रार केल्याने निलेश यांनी दारू पिऊन चिडून जाऊन पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. याबाबत प्रेमा निलेश शेलार (वय ३५ वर्षे रा. राजवाडा, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. 

शिरूर तालुक्यात महिलेला धमकी देत चित्रीकरण करत बलात्कार

शिक्रापूर पोलिसांनी निलेश राजू शेलार (वय ३८ रा. राजवाडा पाबळ ता. शिरूर जि. पुणे) यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र बनकर हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात घरी आलेल्या सासऱ्याला जावयाकडून मारहाण

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news husband beaten wife at pabal police