जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा साखर कारखान्याची फसवणूक

साखर कारखान्याला ट्रॅक्टर व लेबर न पुरविता फसवणूक प्रकरणी गुन्हा

जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याला दहा ट्रॅक्टर, ट्रोली व लेबर पुरविण्याबाबतचा ठेका ठेकेदार जाधव यांनी घेतला होता.

शिक्रापूर: जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याला ट्रॅक्टर व लेबर पुरविण्याबाबत करार करून घेऊन कारखान्याकडून पैसे घेऊन देखील ट्रॅक्टर, ट्रोली व लेबर न पुरविता फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे एकनाथ चेरसिंग जाधव या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यात महिलेचा विनयभंग करत धमकी

जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याला दहा ट्रॅक्टर, ट्रोली व लेबर पुरविण्याबाबतचा ठेका ठेकेदार एकनाथ जाधव यांनी घेतला होता. यावेळी सदर ठेक्याबाबत करारनामा करण्यात आलेला असताना साखर कारखान्याकडून जाधव यांना चार लाख रुपये उचल स्वरुपात देण्यात आली होती. मात्र, जाधव यांनी साखर कारखान्याला कोणतेही ट्रॅक्टर, ट्रोली व लेबर दिले नाही.

आम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे द्यावे लागतील नाही तर...

याबाबत सदर कारखान्याचे कामकाज पाहणारे अशोक जाधव यांनी वेळोवेळी ठेकदार एकनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधून कारखान्याचे पैसे परत मागितले असता त्यांनी पैसे देखील दिले नाही. अशोक पांडुरंग जाधव (वय ४९ वर्षे रा. अमृतवेल सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी एकनाथ चेरसिंग जाधव (रा. खेर्डे ता. चाळीसगाव जि. चाळीसगाव) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहेत.

नाथाभाऊ शेवाळे यांच्यामुळे अपघातग्रस्तांना मिळाली मदत!

वरुडेमधील मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिला मदतीचा हात!

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news jategaon vankateshkrupa sugar facto
प्रतिक्रिया (1)
 
Yuvraj salunke
Posted on 18 June, 2021

Shivtakrar mhalungi yethe shok deun masemari chalu ahe