शिरूर तालुक्यात स्वयंघोषीत समाज सेवकच निघाला खंडणी खोर...

खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, विनयभग करणे, दारू विकी करणे, सोबत घातक हत्यार बाळगून नागरिकांना दमदाटी करून गावात दहशत माजवणे, या सारखे गुन्हे करण्यात पारंगत आहेत.

शिरूरः मांडवगण फराटा येथील स्वताःला समाज सेवक समजणारा व सोशल मीडियावर चुकीच्या व्हिडिओ क्लिपचा वापर करून स्वयंघोषीत समाज सेवकच खंडणीखोर निघाले आहेत. शिरूर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यातील महिलेची 'पीएमपी'मधून रोकड लांबवली...

शिरूर पोलिस ठाणे हददीतील मांडवगण फराटा येथील स्वताःला समाज सेवक समजणारा व सोशल मीडियावर चुकीच्या व्हिडिओ क्लिपचा खुबीने वापर करून समाजामध्ये सामान्य लोक, व्यवसायीक यांचे मध्ये भितीचे, दहशतीचे वातावरण निर्माण करून त्यांचे कडून खंडणी वसूल करत होते. उत्पन्नाचे काही एक साधन नसताना स्वताःचे घरात अवैध्य हातभटटीची दारू तयार करून त्याची विकी करून त्यावर त्यांची उपजिवीका करत होते. शिवाय, गावामध्ये सोशल मीडियाव्दारे व्हिडिओ क्लिपच्याव्दारे स्टंट बाजी करून गावातील तरूण वर्गातील मुलांना सोबत घेऊन नवीन नवीन पध्दतीचे गुन्हे करणारा, रेकार्ड वरील गुन्हेगार १) अमोल उर्फ मिथून आनंदा चौगुले व त्याचा साथीदार सख्खा भाउ नामे ०२) पप्पू आनंदा चौगुले (सर्व रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे) यांना शिरूर पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ४४१/२०२१ भादवि कलम ३८४,३८५,३२४,१४३,१४७, १४९, ५०६, १८८,२६९, २७०,२७१, राष्ट्रीय आपती व्यवस्थापन कायदा कलम ५१ साथीचा रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३,४, या मध्ये अटक करण्यात आली आहे.

रांजणगाव पोलिसांनी मोबाईल चोरांना केले २ तासात अटक

May be an image of text that says

पोलिसांच्या पथकाची मटका अड्ड्यावर छापा टाकत धडक कारवाई...

अमोल उर्फ मिथुन आंनदा चौगुले याने मांडवगण फराटा येथे रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल समोरील बॉर्ड जवळ स्वताः व त्याचे साथीदार अजय संजय सुर्यगंध (वय २५ वर्षे रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे), २) रूतिक बंडुसिंग परदेशी (वय २० वर्षे रा. सादलगाव ता. शिरूर जि. पुणे) यांचेकडून २४/०३/२०२१ रोजी दारू ओतून देऊन व्हिडिओ क्लिप तयार केली होती. सोशल मीडियावर ती व्हायरल करून तो स्वताः त्याचे घरात हातभटटी दारू तयार करून त्याची विक्री करीत असताना ही मी माझे साथीदार समाजसेवक आहेत, असे समजामध्ये प्रतिष्ठा मिळविणे करीता व्हायरल केली होती.

विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला हातपाय तोडण्याची धमकी...

अजय संजय सुर्यगंध (वय २५ वर्षे रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे), २) रूतिक बंडुसिंग परदेशी (वय २० वर्षे रा. सादलगाव ता. शिरूर जि. पुणे) यांना राजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे गु.र.नं. २३०/२१ भा.द.वि.कलम ३९२,३८७, ४२७,५०४,५०६,३४ आर्म अॅक्ट ४,२५ या जबरी चोरीच्या गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे कडून १३,५००/- रू. रोख रक्कम, एक चाकू व तीन तलवारी असे घातक हत्यारे त्यांचे कडून राजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनने त्यांना अटक करून जप्त केले आहे. त्यांचे वर यापुर्वी ही शिरूर पोलिस ठाणे येथे विनयभगचा गुन्हा दाखल आहे.

अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा...

वरील सर्व आरोपी हे खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, विनयभग करणे, दारू विकी करणे, सोबत घातक हत्यार बाळगून नागरिकांना दमदाटी करून गावात दहशत माजवणे, या सारखे गुन्हे करण्यात पारंगत आहेत. जनमानसात त्यांना प्रतिष्ठा मिळविणे करीता ते सतत सोशल मीडियावर खोटया व्हिडिओ क्लिप तयार करून त्या व्हायरल करीत होते. रेकार्ड वरील गुन्हेगार १) अमोल उर्फ मिथुन आनंदा चौगुले याचे वर नमुद केले हेड खाली प्रमाणे ०८ गुन्हे दाखल आहेत. व त्याचा साथीदार सख्खा भाऊ पप्पू आनंदा चौगुले याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे करती आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news mandavgan pharata youth arrested