मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

आर्थिक गुन्हे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा देखील समावेश

मंगलदास बांदल यांच्या सह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्या नंतर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली.

शिक्रापूर: शिक्रापूर पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेच्या तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, पैलवान मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची झाडाझडती करण्यात आली आहे.

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

मंगलदास बांदल यांच्या सह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्या नंतर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली. न्यायालयाने मंगलदास बांदल यांना एक जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे: मंगलदास बांदल

Image

...म्हणून मंगलदास बांदल यांना अटक

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या सह एका अनोळखी व्यक्तीवर शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

यावेळी शिक्रापूर पोलिसांनी तातडीने मोठ्या चलाखीने व गोपनीय पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांना अटक केली होती. त्यांनतर मंगलदास बांदल यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने मंगलदास बांदल यांचा जामीन नामंजूर केला. मंगलदास बांदल यांना एक जून २०२१ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मंगलदास बांदल यांची पोलिस चौकशी करत असून, पोलिसांनी कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कोणतीही तक्रार पुढे आलेली नाही.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

शिक्रापूर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व पोलिस तसेच कर्मचाऱ्यांची मदत घेत मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व हडपसर येथील बंगल्यांची तसेच त्यांच्या शिक्रापूर येथील हवेली आणि येकाय कंपनीची मोठी झाडाझडती केली आहे. मात्र, यावेळी केलेल्या झाडाझडती मध्ये पोलिसांना फक्त काही जमिनींचे सात बारा उतारे मिळून आले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी सूरु केलेल्या या सखोल तपासाबाबत परिसरातून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यापूर्वी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गंभीर गुन्हे घडलेले असताना पोलिसांनी त्या गुन्ह्याच्या तपासासाठी अशा पद्धतीची शिताफी का दाखवली नाही? असा देखील सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

Image

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

'शिरुर तालुका डॉट कॉम'च्या बातमी नंतर अधिकाऱ्यांची भागम भाग

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news mangaldas bandal and bunglow raid o