मंगलदास बांदल यांची पत्नी व भावाचा जामीन अर्ज फेटाळला...

माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या कुटंबाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

शिक्रापूर: माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या कुटंबाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पाणीचोरीच्या गुन्ह्यात महिनाभरापूर्वी मंगलदास बांदल आणि त्यांचे भाऊ बापूसाहेब बांदल यांना दिलेला अंतरिम जामीन पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. १९) रद्द केला आहे. याबाबतची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. दुसऱ्या गुन्ह्यात अटक असलेले मंगलदास बांदल यांच्याबरोबरच आता त्यांचे भाऊ बापूसाहेब यांना कधीही अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे: मंगलदास बांदल

शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे राहणारे निवृत्त पोलिस अधिकारी ज्ञानदेव गुलाबराव तनपुरे यांची दोन एकर शेतजमीन आहे. या शेतात त्यांच्या मालकीची एक विहिर आहे. त्या विहिरीतील पाणी बांदल आणि त्यांचे बंधू बापूसाहेब बांदल हे तारेचे कंपाऊंड तोडून त्यांच्या हस्तकांकरवी टँकरद्वारे (एमएच 04; डीडी 4846) गेली अनेक दिवसांपासून पाणी चोरून नेत होते.

मंगलदास बांदलच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला...

याबाबात ज्ञानदेव तनपुरे यांचा मुलगा कैलास याने विचारला असता, ‘आमचे दररोज ६ टॅंकर येथे येत राहतील. तुमच्यात हिंमत असेल तर आडवून दाखवा. तुम्ही विरोध केल्यास तुम्हा बाप-लेकांच्या अंगावरून ट्रॅक्टर घालू व जीवे मारु,’ अशी धमकी बांदल यांच्याकडून तनपुरे यांच्या मुलाला देण्यात आली होती. तनपूरे यांच्या फिर्यादीवरून बांदल व त्यांचे भाऊ बापूसाहेब बांदल यांच्यावर खंडणी, पाणीचोरी, जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा १८ मे रोजी दाखल झाला होता.

मंगलदास बांदल व शिवाजीराव भोसले बँक प्रकरणात तिघा अधिकाऱ्यांना अटक

दरम्यान, या पाणीचोरीच्या गुन्ह्यात पुणे सत्र न्यायालयाने बांदल यांना अंतरीम जामीन दिला होता. हे जामिनाचे न्यायालयाचे आदेशपत्र शिक्रापूर पोलिसांना सादर करण्यासाठी मंगलदास बांदल हे २६ जून रोजी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गेले हेाते. त्यावेळी दत्तात्रेय मांढरे यांच्या फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात बांदल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन गुन्हे बांदल यांच्यावर दाखल होऊन त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यांचे भाऊ बापूसाहेब बांदल यांना अटक होणे बाकी होते.

मंगलदास बांदल यांना साथ देणाऱया माजी सरपंचासह तिघांना अटक

मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी वाढ

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

...म्हणून मंगलदास बांदल यांना अटक

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news mangaldas bandal and family court r