जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

सेवा निवृत्त पोलिसाने केले स्वतः शिक्रापूर पोलिसांत गुन्हे दाखल

नाय तुमचे हात पाय तोडले तर बांदल नाव सांगणार नाही, असे म्हणून तुम्हा बाप लेकांना तुमच्याच शेतात अंगावर टँकर घालून गाडून टाकू अशी धमकी दिली.

शिक्रापूर: पुणे जिल्ह्यातील राजकीय पैलवान समजले जाणारे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यासह त्यांचा भाऊ बापूसाहेब बांदल आणि त्यांच्या टँकर चालकावर शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले आहेत.

पैशासाठी पत्नी व आईला केली बेदम मारहाण...

जमिनीचे कंपाऊंड तोडून बेकायदेशीरपणे रस्ता बनवून विहिरीतील पाणी उपसून खुनाची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सणसवाडी येथे सेवानिवृत्त पोलिस असलेले ज्ञानदेव तनपुरे यांची शेती आहे. सदर जमिनीचे तारेचे कंपाऊंड मंगलदास बांदल व त्यांचा भाऊ बापूसाहेब बांदल यांनी तोडून त्यांचे जमिनीतून बेकायदेशीरपणे रस्ता तयार केला. त्यांनतर त्या रस्त्याने एम एच ०४ डी डी ४८४६ हा पाण्याचा टँकर घेऊन जाऊन तनपुरे यांच्या विहिरीवरील पाणी घेऊन जाऊ लागले.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिक्रापूरमध्ये अल्पवयीन युवतीचा विनयभंग...

दरम्यान, तनपुरे यांचा मुलगा कैलास याने तुम्ही आमच्या शेतातून पाणी घेऊन जाऊ नका, तुमच्या टँकरमुळे आमची शेती खराब होत आहे, असे म्हटले. बापूसाहेब बांदल याने आमचा टँकर दररोज तुमच्या येथून सहा पाण्याचे टँकर घेऊन जाईल ते पण तुमच्या विहिरीतून आणि शेतातून दम असेल तर अडवून दाखवा, नाय तुमचे हात पाय तोडले तर बांदल नाव सांगणार नाही, असे म्हणून तुम्हा बाप लेकांना तुमच्याच शेतात अंगावर टँकर घालून गाडून टाकू अशी धमकी दिली.

शिरूर तालुक्यात फरार असलेला चंदन तस्कर अखेर जेरबंद

May be an image of text

रुग्णवाहिकेत अश्लिल कृत्य करणारी मुलगी अन तीन युवक ताब्यात

याबाबत सेवानिवृत्त पोलिस ज्ञानदेव गुलाबराव तनपुरे (वय ६८, रा. सुभाषनगर धानोरी पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल, बापूसाहेब विठ्ठलराव बांदल व त्यांचा टँकर चालक (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सध्या सर्व जण फरार झाले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news mangaldas bandal police complaint s
प्रतिक्रिया (1)
 
Nice
Posted on 18 May, 2021

No comments

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे