मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

शिक्रापूर येथील व्यक्तीच्या गाळ्याचे फसवणूक व बँकेचे बनावट कर्ज प्रकरण

शिक्रापूर पोलिसांनी तातडीने मोठ्या चलाखीने व गोपनीय पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल यांना अटक केली होती.

शिक्रापूर: पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांना पोलिसांनी आज (गुरुवार) न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने मंगलदास बांदल यांना एक जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

...म्हणून मंगलदास बांदल यांना अटक

मंगलदास बांदल यांच्या सह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या तीन साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल होत शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या सह एका अनोळखी व्यक्तीवर शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे: मंगलदास बांदल

Image

शिक्रापूरमध्ये दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; किती बाटल्या मिळाल्या पाहा...

शिक्रापूर पोलिसांनी तातडीने मोठ्या चलाखीने व गोपनीय पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांना अटक केली होती. त्यांनतर आज मंगलदास बांदल यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यांचा जामीन नामंजूर करत त्यांना एक जून २०२१ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

Image

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

शिरूर तालुक्यातून चोरी झालेली फॉरच्यूनर सापडली राजस्थानात पण...

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news mangaldas bandal police custody shi