शिक्रापूरमध्ये अल्पवयीन युवतीवर बलात्कार

युवतीचे दुसऱ्याशी लग्न केल्यास फोटो प्रसारित करण्याची धमकी

सतरा वर्षीय युवती हि शाळेत जात असताना गजानन हा वारंवार तिचा पाठलाग करून त्रास देत होता. दरम्यान त्याने युवतीला माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका अल्पवयीन युवतीला वारंवार दमदाटी करत मारुन टाकण्याची धमकी देत तिचे दुसऱ्याशी लग्न केले तर तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करेल, अशी धमकी युवतीच्या पालकांना दिल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गजानन तुळशीराम चव्हाण या युवकावर बलात्कारसह आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

प्रेमप्रकरणातून फेसबुक लाईव्ह करत युवकाची आत्महत्या

शिक्रापूर येथील सतरा वर्षीय युवती हि शाळेत जात असताना गजानन चव्हाण हा वारंवार तिचा पाठलाग करून त्रास देत होता. दरम्यान त्याने युवतीला माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. युवतीला त्याच्या घरी बोलावून घेत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यांनतर वेळोवेळी गजानन हा युवतीला भेटण्यासाठी जबरदस्ती करुन तिच्याशी शिक्रापूर तसेच कोरेगाव भीमा परिसरात घेऊन जात शारीरिक संभोग करत राहिला.

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

Image

मोठी बातमी! दहावीचा निकाल 'असा' लागणार...

गजानन याच्याकडून मोठ्या प्रमाणात त्रास सुरु राहिल्याने पीडित युवतीने तिच्या काही पालकांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. यावेळी युवतीच्या पालकांनी गजानन चव्हाण याची भेट घेऊन त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गजानन याने युवतीच्या पालकांना देखील दमदाटी करत मारहाण केली. युवतीच्या पालकांनी तिचे दुसऱ्या कोणाशी लग्न लावून दिले तर तिचे काढलेले फोटो सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी दिली. याबाबत पीडित युवतीने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

Image

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

शिक्रापूर पोलिसांनी गजानन तुळशीराम चव्हाण (वय २३ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. खुरामपूर ता. लोणार जि. बुलढाणा) या युवकावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवदास खाडे हे करत आहेत.

सणसवाडीत महिला अकाउंटटने केला लाखो रुपयांचा अपहार

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news minor girl rape shikrapur police re