शिरूर तालुक्यात महिलेचा विनयभंग, चौघांवर गुन्हे दाखल...

खैरेवाडीत पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग

महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे देखील कृत्य सदर व्यक्तींनी केले. याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.

शिक्रापूर: खैरेवाडी (ता. शिरुर) येथील एका महिलेसह महिलेच्या पती व सासऱ्यांना मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विठ्ठल तुकाराम खैरे, गौरव विठ्ठल खैरे, आबासाहेब गोपीनाथ पवार, तुकाराम ज्ञानोबा खैरे असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तळेगाव ढमढेरे येथील खून संशयातून झाल्याचे उघड

खैरेवाडी येथील महिला घरात काम करत असताना शनिवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास विठ्ठल खैरे, गौरव खैरे, आबासाहेब पवार व तुकाराम खैरे हे महिलेच्या घरी आले. त्यांनी महिलेच्या पतीला आवाज देत घराबाहेर बोलावून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी महिला व महिलेचे सासरे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता सर्वांनी त्यांना देखील मारहाण करण्यास सुरवात केली.

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने...

दरम्यान, महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे देखील कृत्य सदर व्यक्तींनी केले. याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विठ्ठल तुकाराम खैरे, गौरव विठ्ठल खैरे, आबासाहेब गोपीनाथ पवार, तुकाराम ज्ञानोबा खैरे (चौघे रा. खैरे वाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बाळासाहेब थिकोळे हे करत आहेत.

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news molestation at khairewadi police re
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे