तळेगाव ढमढेरे येथील खून संशयातून झाल्याचे उघड

पाबळ येथील नवनाथ चौधरी या युवकाचा झाला खून

तळेगाव ढमढेरे येथील तळेगाव-न्हावरा रस्त्याच्या कडेला दोघांमध्ये कोणत्यातरी कारणातून वाद सुरु असताना हरीश काळे याने एकावर दगडाने हल्ला करून डोक्यात घालून त्याचा खून केला होता.

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शनिवारी  (ता. ५) एका युवकाने एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीचा खून केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिरूर तालुक्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

सदर घटनेतील व्यक्तीची ओळख पटली असून, नवनाथ संपत चौधरी असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. शिक्रापूर पोलिसांनी खुनातील आरोपी हरीश सुधाकर काळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने...

तळेगाव ढमढेरे येथील तळेगाव-न्हावरा रस्त्याच्या कडेला दोघांमध्ये कोणत्यातरी कारणातून वाद सुरु असताना हरीश काळे याने एकावर दगडाने हल्ला करून डोक्यात घालून त्याचा खून केला होता. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन साठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवला होता. या घटनेतील संशयित आरोपी हरीश काळे याला ताब्यात घेतले होते.

नगरमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱयाकडून धक्कादायक प्रकार समोर...

May be an image of text

टाकळी हाजी येथील खुनाच्या गुन्ह्यातील मास्टरमाइंड अटकेत

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याने अनोळखी व्यक्तीच्या खुनाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्रापूर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरु केले. मात्र, याबाबत तळेगाव ढमढेरेचे पोलिस पाटील पांडुरंग नरके (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी हरीश सुधाकर काळे (वय ३०, रा. शासकीय गोदाम जवळ तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

Image

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

सदर घटनेतील मृत व्यक्तीची चौकशी करत असताना खून झालेला युवक पाबळ येथील असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली. शिक्रापूर पोलिसांनी पाबळ येथे जात चौकशी केली असता सदर खुनातील मृतदेह हा नवनाथ संपत चौधरी (रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे) या युवकाचा असल्याचे समोर आले. दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी आरोपी हरीश काळे याच्याकडे चौकशी केली असता सदर खून हा त्याने संशयातून केला असल्याचे समोर आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहेत.

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news murder at talegaon dhamdhre police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे