पाबळच्या ग्रामपंचायत सदस्याने दिली निवडणूक अर्जात खोटी माहिती

नायब तहसीलदारांनी केला शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाची फसवणूक करत आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती लावापून ठेवली होती. याबाबत तक्रार केल्याने सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत.

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्याने निवडणूक अर्ज भरताना काही माहिती लपवून खोटी माहिती सादर केल्याचे समोर आले असल्याने ग्रामपंचायत सदस्य सोपान लक्ष्मण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 

मंगलदास बांदल यांच्याबाबत मोठी बातमी; काय ती पाहा...

पाबळ येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सदस्या तसेच माजी सरपंच सोपान जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणुक अर्ज भरताना त्यामध्ये दाखल गुन्हाची माहिती नामनिर्देशन पत्रात नमुद करणे बंधनकारक असताना देखील जाधव यांनी जाणीवपूर्वक माहिती दिली नाही. याबाबत ग्रामपंचायत सदस्य ऋषीकेश कोल्हे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनतर जिल्हाधिकारी यांनी शिरुर तहसीलदार यांना सदर ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिरुर तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार स्नेहा खुशालजी गिरीगोसावी (वय ३३ रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.

शिरुर तहसील कार्यालयातील एजंटगिरी संपणार का ?

शिक्रापूर पोलिसांनी पाबळ ग्रामपंचायतचे सदस्य तसेच माजी सरपंच सोपान लक्ष्मण जाधव (रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल ढेकणे हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात चोरी करणाऱया टोळीच्या म्होरक्यासह टोळी जेरबंद...

सदस्य पद रद्द साठी अर्ज करणार...
सोपान जाधव यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक करत आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती लावापून ठेवली होती. याबाबत तक्रार केल्याने सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र, आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर व्यक्तीचे सदस्य पद रद्द करण्यासाठी अर्ज करत सदर अर्जाचा पाठपुरावा करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश कोल्हे यांनी सांगितले.

शिरूर तहसिल कार्यालयात 'एजंटगिरी' करणाऱ्यांवर कारवाई करा...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news pabal grampanchayat member sopan ja