शिक्रापूर येथे दरोडा टाकून पाबळमध्ये खून करणा-यास अटक...

लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत वाढत्या डी.पी. चोरीच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली.

पुणेः शिक्रापुर पोलिस ठाणे हद्दीतील जमदाडे मळा पिंपळवाडी रोड पाबळ (ता. शिरुर जि. पुणे) येथील तुळसाबाई पर्वती जाधव यांचे राहते घरी ०१/०५/२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास दरोडा घालुन तुळसाबाई यांची मुलगी शकुंतला प्रकाश शिंदे हिचा खून केलेला सराईत आरोपी दिनेश कुंदन पवार,(वय २५ वर्षे, रा. गणपती माळ तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यास अटक करुन गुन्हा उघडकीस आणण्याची मोलाची कामगिरी लोणीकंद तपास पथकाने केली आहे.

शिरूर तालुक्यात घरा शेजारील झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी...

लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत वाढत्या डी.पी. चोरीच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पेरणे डोंगरगाव रोडवर दोन व्यक्ती डी.पी.च्या आजुबाजुस संशयीत रित्या फिरत आहेत. सदर बातमी बाळासाहेब सकाटे यांनी सहा. पोलिस निरीक्षक निखील पवार यांना कळविली असता, तपास पथकातील पोलिस अंमलदार कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे, पांडुरंग माने असे सदर ठिकाणी जावुन संशयीत नामे शिवा नाना जगताप (वय ४० वर्षे, रा. केडगाव मार्केटच्या पाठीमागे ता. दौंड जि. पुणे) याने व त्याचा साथीदार दिनेश कुंदन पवार यांना ताब्यात घेवुन लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे येथे आणले.

Death: जुन्नर तालुक्यात पतसंस्थेत गोळीबार व्यवस्थापकाचा मृत्यू

दोघांना गुन्ह्यात अटक करुन पोलिस कोठडी दरम्यान त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे डी.पी. चोरी गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी लोणीकंद पोलिस स्टेशन परिसरातील ०५ डी.पी. चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १,८७,०००/- रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर चोरीचा माल स्विकारणारा विरम दिपाराम चौधरी (वय ५० वर्षे, रा. ग्रीलवुड सोसा. शिक्रापुर तळेगाव रोड शिक्रापुर ता. शिरुर जि. पुणे) यांस अटक करण्यात आली आहे. आरोपी नामे दिनेश पवार याचेकडे डी.पी.चोरीच्या अनुषंगाने सखोल व कौशल्यपुर्ण तपास करीत असताना त्याने व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेसह दि. ०१/०५/२०२१ रोजी जमदाडे मळा पाबळ येथे दरोडा टाकुन एका मुलीचा खुन केल्याची कबुली दिली आहे.

Murder: पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला कुऱ्हाडीसह अटक

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, यांचे अध्यक्षतेखाली, पोलिस उप आयुक्त रोहीदास पवार,सहा. पोलिस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. गजानन पवार पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. राजेश तटकरे, सहा. पोलिस निरीक्षक निखील पवार, पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे, सहा.पोलिस फौजदार मोहन वाळके, पोलिस अंमलदार बाळासाहेब सकाटे, विनायक साळवे, कैलास साळुंके, अजित फरांदे, समिर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे, पांडुरंग माने, सागर शेंडगे यांनी केली आहे.

School: शिरुर तालुक्यातील देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा अखेर पदार्फाश

Shikrapur Police: शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची कारवाईस टाळाटाळ...?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news pune police arrested for murder and