शिरूर तालुक्यातून दुचाकी चोरणारा ताब्यात...

घटनास्थळी जावून स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या जवळ नंबर प्लेट नसलेल्या दोन मोटार सायकली मिळून आल्या.

पुणेः शिरूर तालुक्यातून मोटार सायकल चोरी करणा-या चोरास युनिट ६ ने जेरबंद केले आहे. पुढील तपासासाठी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यात करणीच्या प्रकाराने खळबळ; मुलीचा फोटो...

सचिन पवार यांना युनिट ६ चे हद्दीत शुक्रवारी (ता. 16) गस्त करत असताना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अशोक बळीराम थोरात (वय २३ वर्षे, व्यवसाय मजूरी, रा. सध्या गणेश काळे यांच्या खोलीत काळेचा ओढा, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, मुळगाव- मु. बाळकृष्णनगर, पो. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) याचेकडे चोरीच्या मोटार सायकली असून, तो त्याच्या घराजवळ थांबलेला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी हत्यारांसह अटक केलेल्या आरोपीवर खंडणीचा गुन्हा

गणेश माने, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांना कळविले असता त्यांनी सदर माहितीची खातरजमा करून माहितीप्रमाणे नमुद ठिकाणी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. घटनास्थळी जावून स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या जवळ नंबर प्लेट नसलेल्या दोन मोटार सायकली मिळून आल्या. विश्वासात घेवून तपास केला असता त्याने सदरच्या मोटारसायकली चोरून आणल्याचे कबुल केले. त्यास सीआरपीसी कलम ४१(१)(ड) अन्वये ताब्यात घेण्यात आले. सदर मोटार सायकलीबाबत अधिक तपास करता त्यापैकी २०,०००/- रु किंमतीची होंडा पॅशन प्रो ही मोटारसायकल रांजणगाव पोलिस स्टेशन पुणे ग्रामिण गु.र.नं. १४८/२०१६ भा.दं.वि. कलम ३७९ या गुन्हयातील व २५,०००/- रु किंमतीची बजाज डिस्कव्हर हि मोटारसायकल आष्टी पोलिस स्टेशन जिल्हा बीड गु.र.नं. २१४/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९ या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून एकूण ४५,०००/- रु किंमतीच्या दोन गोटार सायकली ताब्यात घेवून आरोपीस रांजणगाव पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कारेगावच्या विकासकामांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरो

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त, डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे श्री अशोक मोराळे, पोलिस उप आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे २ श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट, ६ चे पोलिस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

शिक्रापूरमध्ये तलवार घेऊन दहशत करणारा सराईत पिस्तुलासह जेरबंद

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news pune unit 6 arrested for bike robbe