रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला केले जेरबंद

पुणे-नगर महामार्गावर प्रवाशांना शस्ञाचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

रांजणगाव गणपती: पुणे-नगर महामार्गावर प्रवाशांना शस्ञाचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली.

दहिवडीत पिकअप वाहनातून दारू वाहतूक करणाऱयाला अटक

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये फैसल मलिक अहमद यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी सोबत वाद घालून अपघात झाला आहे, अशी बतावणी करून रोख रक्कम व एटीएम मधून काही पैसे काढून घेऊन त्यांना लुटणा-या टोळीस रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

शिरूर तालुक्यात स्वयंघोषीत समाज सेवकच निघाला खंडणी खोर...

शुक्रवारी (ता. 18) राञी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मिञ त्यांच्याकडे असलेले वाहन एम.एच ०१ ए.यु. २९०९ या वाहनातून जात असताना एम एच.१२ आर.ई. ४९९३ या दुचाकीवरून आलेल्या वाहन चालकांनी अपघाताचा बहाना करून चाकूचा धाक दाखवला. फैसल यांच्याकडून ३५०० काढून घेतले व त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना आणखी दीड लाख रुपयांची मागणी करून त्यांना पेट्रोल पंपावर घेऊन गेले. एटीएम कार्ड वरून १० हजार रुपये काढून घेतले. सदरची घटना फिर्यादीच्या मित्रांनी पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना सांगितली.

रांजणगाव पोलिसांनी मोबाईल चोरांना केले २ तासात अटक

May be an image of text that says

शिरूर तालुक्यातील महिलेची 'पीएमपी'मधून रोकड लांबवली...

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप येळे यांना या घटनेची माहिती देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. रितेश वाल्मीक वाळके (वय २९) आणि अजय संजय सूर्यगंध (वय २५, दोघेही राहणार मांडवगण फराटा) यांना ताब्यात घेतले. पळून गेलेला आरोपी ऋतिक बंडूसिंग परदेशी याचा पोलिसांनी शोध घेतला असता  त्याच्या खोली मध्ये एक चाकू व तीन तलवारी अशी हत्यारे आढळून आली.

अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा...

सदर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, हि कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष मुंढे, संदीप येळे, रघुनाथ हळनोर, प्रकाश वाघमारे, उमेश कुतवळ, विजय शिंदे, अनिल चव्हाण यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष मुंढे हे करीत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news ranjangaon midc police 2 arrested