पाबळला चोरट्यांच्या हल्ल्यात मायलेकी जखमी...

महिलेवर वार करत पळविला घरातील ऐवज

घराचा दरवाजा वाजविल्याचा आवाज आला. आपला नातू कामावरून आला असेल असा समज झाल्याने तुळजाबाई जाधव यांनी घराचा दरवाजा उघडला.

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरूर) येथील जमदाडे मळा येथे आज (शनिवार) दोन चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार आहेत. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दोन अज्ञात चोरट्यांवर जबरी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रांजणगाव एमआयडीसी मध्ये जबरी चोरी करणारा जेरबंद

पाबळ येथील जमदाडे मळा या ठिकाणी राहणाऱ्या तुळसाबाई जाधव त्यांच्या शकुंतला जाधव या मुलीसह घरात झोपल्या होत्या. त्यांचा नातू कामावर गेला होता. आज १ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा वाजविल्याचा आवाज आला. आपला नातू कामावरून आला असेल असा समज झाल्याने तुळजाबाई जाधव यांनी घराचा दरवाजा उघडला. परंतु, याच वेळी घराबाहेरील एका चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाधव यांनी त्यास प्रतिकार करत त्याचा हात ओढून चावा घेतला. घरात झोपलेल्या त्यांच्या मुलीला आवाज देत मदतीला बोलावून घेतले.

शिरूर तालुक्यातील गावामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

दरम्यान त्यांची मुलगी शकुंतला शिंदे ही मदतीसाठी धावून येत असताना याच वेळी घरा बाहेर दबा धरून बसलेल्या दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या शकुंतला शिंदे या मुलीचा हात पकडून तिच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करत तिच्या गळ्यातील गंठण ओढून घेतले. यावेळी झालेल्या झटापटीत दोघी मायलेकी घराबाहेर पडल्या व त्यानंतर तुळसाबाई जाधव यांनी शेजारी नागरिकांना मदतीसाठी बोलावले.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

'शिक्रापूरमधील तावसकर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न'

शेजारील नागरिकांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शकुंतला शिंदे या गंभीर जखमी झाल्याने जमिनीवर पडलेल्या होत्या. सर्वांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील दोन सुटकेस आणि त्यामधील कपडे पैशाची पिशवी चोरीला गेल्याचे दिसून आले. यावेळी तुळसाबाई जाधव या किरकोळ जखमी झाल्याने त्यांचावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शकुंतला शिंदे यांना शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, शिवराम खाडे यांसह आदींनी घटना स्थळी धाव घेतली. या ठिकाणी काही युवकांच्या चपला मिळून आल्या आहेत. पुणे येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानने चक्क तीन किलोमीटर पर्यंत माग काढला. परंतु, चोरट्यांचा तपास लागला नाही.

शिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

सदर घटनेत चोरट्यांनी एक तोळा वाजणाचे सोन्याचे गंठण तसेच जुन्या कपड्यांच्या दोन सुटकेस व त्यामधील तीन हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत तुळसाबाई पर्वती जाधव (वय ७०, रा. जमदाडे मळा पाबळ ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोन चोरट्यांवर जबरी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे व पोलिस नाईक प्रताप कांबळे हे करत आहेत.

सणसवाडीजवळ मित्राचा खून करणारा पाच तासात जेरबंद

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka crime news robbery at pabal two women injured
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे