उमेश तावसकर यांच्या विरोधात आता खंडणीची तक्रार

पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये मला पोलिस स्टेशन मध्ये बोलावून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दमदाटी करून जमिनीबाबतचा मान्य नसलेला मजकूर मुद्रांकावर लिहून देण्यास लावले.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी शिवसेनेचे पदाधिकारी असलेले शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ, दमदाटी करत खुनाची धमकी दिल्याप्रकरणी चांगलेच अडचणीत आले आहेत. आता चक्क पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात खंडणीची तक्रार देण्यात आल्याने तावसकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तावसकर, सासवडेंच्या आखाड्यात भाऊसाहेब आंधळकरांची 'इंट्री'

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश औदुंबर तावसकर यांनी १९ एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असताना शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांसह पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करत खुनाची धमकी दिली होती. शिवाय, रामभाऊ सासवडे यांच्या कुटुंबातील महिलांबाबत अश्लील शब्दांचा वापर केला होता. याबाबतची ऑडीओ क्लिप देखील प्रसारित झाली. त्यानंतर रामभाऊ सासवडे यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार केली असता त्यांची चौकशी सुरु करत तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

बापरे! शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकाची अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांची नियंत्रण कक्षात बदली

सदर प्रकारानंतर लगेचच रामभाऊ सासवडे यांच्या पत्नीने विनयभंग प्रकरणी तक्रार दाखल केली. मात्र, यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे हजर असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी अमृतराव देशमुख यांनी सदर पोलिस निरीक्षक यांची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होताच गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले. मात्र, सदर प्रकरण चांगलेच तापत असताना आता शिक्रापूर येथील शुभम तानाजी जगताप या युवकाने दिलेल्या तक्रारी नुसार पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये मला पोलिस स्टेशन मध्ये बोलावून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दमदाटी करून जमिनीबाबतचा मान्य नसलेला मजकूर मुद्रांकावर लिहून देण्यास लावले. तुझ्यावर मोक्क्याचा गुन्हा लावतो, असे धमकावून मोक्का लावायचा नसेल तर वीस लाखांच्या खंडणीची मागणी केली आणी त्यांच्या दोन साथीदारांना फोन करून पैसे घेण्यास सांगितले.

शिक्रापूरच्या पोलिस निरीक्षकांची चौकशी सुरू...

याबाबत शुभम जगताप पोलिस अधीक्षक कार्यालयात गेला असल्याचे समजताच पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या दोघा खासगी साथीदारांनी शुभम जगताप यास त्यांच्या गाडीमध्ये बसवून घेऊन जात मारहाण करून त्याच्याकडून रोख दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेतले. तसेच पंचवीस हजार रुपये बँक खात्यावरून घेतले आणि उरलेले पैसे सहा महिन्यात देतो असे शुभम जगताप याने भीतीपोटी सांगितले होते. मात्र, सध्या उमेश तावसकर यांची बदली झाल्याचे समोर आल्याने शुभम तानाजी जगताप (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) या युवकाने पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्यासह त्यांच्या दोन खाजगी साथीदारांच्या विरोधात खंडणी, शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी नुकतीच तक्रार दाखल केली आहे.

'शिक्रापूरच्या पोलिस निरीक्षकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा'

दरम्यान, पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांचे प्रकरण चांगलेच तापत असून, सध्या वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्षनेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्रापूरच्या पोलिस निरीक्षकाची निलंबनाची मागणी; अन्यथा...

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

दरम्यान, पोलिस निरीक्षक उमेश तावसकर याची नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यात फक्त www.shirurtaluka.com ने वेळोवेळी सातत्याने बातम्या प्रसारीत केल्या होत्या. वेबसाईटने लावून धरलेल्या प्रकरणाचा हा दणका समजला जात आहे.

शिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka crime news shikrapur pi umesh tawaskar complai
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे