दहिवडीत पिकअप वाहनातून दारू वाहतूक करणाऱयाला अटक

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाचा दहिवडी येथे कारवाई करत छापा

पिकअप चालकाला थांबवून पिकअप मध्ये पाहणी केली असता त्या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात दारुचा साठा मिळून आला.

शिक्रापूर: दहिवडी (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मधून पिकअप वाहनातून बेकायदेशीर पणे दारुची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पिकअप वाहन व दारुच्या साठ्यासह जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. ज्ञानेश्वर बाळू वायदंडे असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शिरूर तालुक्यात स्वयंघोषीत समाज सेवकच निघाला खंडणी खोर...

दहिवडी शिरुर येथील नंदनवन हॉटेल मधून एका पिकवाहनातून दारुचा साठा विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे, पोलिस शिपाई जयराज देवकर, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, लक्ष्मण शिरसकर, अशोक केदार, निखील रावडे, राहुल वाघमोडे यांसह आदींनी तळेगाव ढमढेरे न्हावरा रस्त्याने नंदनवन हॉटेल जवळ जाऊन छापा टाकला. त्यांना एम एच १२ एस एफ ९४८६ क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा पिकअप हॉटेल मधून बाहेर जाताना दिसला. यावेळी पोलिसांनी सदर पिकअप चालकाला थांबवून पिकअप मध्ये पाहणी केली असता त्या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात दारुचा साठा मिळून आला. यावेळी पोलिसांच्या पथकाने पिकअप वाहन व दारुचा साठा असा तब्बल चार लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रांजणगाव पोलिसांनी मोबाईल चोरांना केले २ तासात अटक

May be an image of text that says

शिरूर तालुक्यातील महिलेची 'पीएमपी'मधून रोकड लांबवली...

याबाबत पोलिस शिपाई जयराज वसंत देवकर (वय ३३ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी पिक अप चालक ज्ञानेश्वर बाळू वायदंडे (वय २६ वर्षे रा. दहिवडी ता. शिरुर जि. पुणे) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.

अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news shikrapur police cheak pickup temp