पाबळला जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांचा छापा

एका व्यक्तीच्या घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, योगेश शामकांत शिंदे, शामकांत दगडी शिंदे व दत्तात्रय बाजीराव जाधव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

मंगलदास बांदल यांची पत्नी व भावाचा जामीन अर्ज फेटाळला...

पाबळ येथील एकाच्या घरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली होती. त्यांनतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस नाईक अमोल दांडगे, सागर कोंढाळकर, विकास पाटील, जयदिप देवकर, लक्षमण शिरसकर, किशोर शिवणकर यांसह आदींनी सदर ठिकाणी जात छापा टाकला.

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीमध्ये पुन्हा कारवाई...

सदर ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यावेळी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने यावेळी त्यांना ताब्यात घेत तेथील पस्तीस हजार रुपये तसेच आदी साहित्य असा बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. योगेश शामकांत शिंदे, शामकांत दगडी शिंदे व दत्तात्रय बाजीराव जाधव (सर्व रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.

धामारीत एकोणीस वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news shikrapur police raid on pabal and