शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीमध्ये पुन्हा कारवाई...

सणसवाडीत गुटखा अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांचा छापा

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हावलदार जितेंद्र पानसरे हे करत आहेत.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिसांच्या पथकाने मागील आठवड्यात सणसवाडी परिसरात गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई करत तब्बल अठ्ठ्याहत्तर लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने पुन्हा सणसवाडीत गुटखा अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केल्याने गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

पिंपळे जगताप मधून कत्तलीला चाललेल्या चौदा गोमातेंना जीवदान

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

सणसवाडी येथील एकाने अवैध्यपणे गुटखा विक्री करण्यासाठी एका खोलीमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवला आहे, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे, पोलिस नाईक विकास पाटील, अमोल दांडगे, जयदिप देवकर, निखील रावडे, किशोर शिवणकर यांसह आदींनी सणसवाडी येथील गणेश हरगुडे यांच्या खोलीमध्ये जात छापा टाकला. त्यांना सदर ठिकाणी बंदी असलेला गुटखा तसेच तंबाकू मिश्रित पदार्थ मिळून आले.

धामारीत एकोणीस वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, गुटखा साठा करणारा गणेश हरगुडे या वेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणहून तब्बल पंचेचाळीस हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत पोलिस शिपाई निखील भिमाजी रावडे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी गणेश कांतीलाल हरगुडे (रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हावलदार जितेंद्र पानसरे हे करत आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी हत्यारांसह अटक केलेल्या आरोपीवर दोन खंडणीचे गुन्हे

इतर ठिकाणी कारवाई बाबत पोलिस उदासीन का?
शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमधील प्रत्येक गावामध्ये सर्रासपणे खुलेआम गुटखा विक्री होत असून, पोलिसांकडून सदर ठिकाणी दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी गुटखा विक्री होत असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील होत असताना पोलिस कारवाई बाबत उदासीन का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news shikrapur police raid on sanaswadi