कोरेगाव भीमात नागरिकांच्या सतर्कतेने तीन सराईतांना पकडले

पकडलेल्या आरोपींवर यापूर्वी तीस हून अधिक गुन्हे दाखल

शिक्रापूर पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे चोरी करण्यासाठी आलेल्या आरोपींना नागरिकांच्या मदतीने जेरबंद केले असताना ते एका गुन्हेगारी टोळीशी निगडीत आहेत.

शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे चोरी करण्यासाठी आलेल्या तिघा सराईतांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. हुकुमसिंग रामसिंग कल्याणी, लखनसिंग राजपूत सिंग व रवीसिंग श्यामसिंग कल्याणी असे अटक केलेल्या तिघा सराईतांची नावे आहेत.

पाबळ मध्ये पोलिसांत तक्रार केल्याने महिलेला मारहाण

कोरेगाव भीमा येथे पहाटेच्या सुमारास सारंग चकोर हा युवक घराबाहेर आलेला असताना त्याला एक कार आनंद पार्क परिसरात संशयित पणे उभी असल्याची दिसली. शिवाय, एक तोंड बांधलेला युवक तेथे उभा असल्याचे दिसून आले. यावेळी चकोर यांनी तातडीने शेजारील प्रत्युघ्न शिंदे या युवकाला याबाबत माहिती देत त्याचे घराजवळ पाहणी करण्यास सांगितले. आनंद पार्क सोसायटी मधील सुधाकर ढेरंगे यांच्या बिल्डींगमध्ये चोर आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना याबाबत माहिती दिली.

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर विचित्र अपघात...

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलिस नाईक जयराज देवकर, किशोर शिवणकर, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, रोहिदास पारखे यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत येथील खंडेराव चकोर, प्रत्युघ्न शिंदे, सुरज मांजरे, सारंग चकोर, निहाल गव्हाणे यांच्या मदतीने येथे आलेल्या संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे काही हत्यारे मिळून आली असून, त्यांनी सदर ठिकाणी चोरी करण्यास आल्याची कबुली देखील दिली. शिक्रापूर पोलिसांनी त्यांच्याजवळील काही हत्यारे तसेच एम एच १२ आर एफ २०४५ हि कार देखील जप्त केली असून, सदर कार देखील चोरीची असल्याचा संशय बळावला आहे.

शिरूर तालुक्यात महिलेला धमकी देत चित्रीकरण करत बलात्कार

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजेश प्रकाश माळी (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय ३०) व रवीसिंग श्यामसिंग कल्याणी (वय २२, दोघे रा. रामटेकडी मारुती शोरूम जवळ सोलापूर रोड हडपसर पुणे), लखनसिंग राजपूत सिंग (वय ३१ वर्षे रा. आनंद हायस्कूल जवळ हडपसर पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत तिघांना अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रणजीत पठारे हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात घरी आलेल्या सासऱ्याला जावयाकडून मारहाण

आरोपींवर तब्बल वीस हून अधिक गुन्हे दाखल...
शिक्रापूर पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे चोरी करण्यासाठी आलेल्या आरोपींना नागरिकांच्या मदतीने जेरबंद केले असताना ते एका गुन्हेगारी टोळीशी निगडीत असून, अटक करण्यात आलेल्या तिघांवर पुणे शहरात अनेक अनेक ठिकाणी वीस हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्रापूर पोलिस व नागरिकांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news shikrapur police three arrested kor