Video: न्हावरेत टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा गांजा जप्त

मोटार रस्त्याच्या बाजूला उभे करून आम्ही सर्वजण खाली उतरून त्या पालास चारही बाजूंनी वेढा टाकला. त्यावेळी सदर पालामध्ये चार व्यक्ती बसलेले होते.

शिरूर: न्हावरे (ता. शिरूर) साखर कारखान्याच्या बाजूला असलेल्या न्हावरे-आलेगाव पागा रस्त्यावर एका पालामध्ये शिरूर पोलिसांनी छापा टाकून गांज्याची साठवणूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला ७८ किलो गांजा (अमली पदार्थ) जप्त केला आहे. या गांजाची किंमत किंमत १६ लाख ३८ हजार रुपये असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

सुनिल रूपराव पवार (वय २०), आकाश सर्जेराव पवार (वय २०), विशाल कैलास मोहिते (वय १८), प्रकाश सर्जेराव पवार (वय १८, सर्व रा. टाकरखेड ता.विखली जि. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे.

सणसवाडी येथील कंपनीत सुरक्षारक्षकांनी केलेला प्रकार सीसीटीव्हीमुळे उघड

सोमवारी (ता. 26) गोपनीय माहिती मिळाली की न्हावरे गावचे हददीत साखर कारखान्याचे न्हावरा ते आलेगांव पांगा या गावाकडे जाणा-या रोडच्या उत्तरेस एका पालामध्ये विक्री करण्याकरीता गांजाची साठवणूक करून ठेवलेली आहे. तत्काळ गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलिस अधीकारी दौड राहुल धस, उपविभागीय पोलिस अधीकारी दौड अमृत देशमुख यांच्या आदेशानुसार व शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक हनुमंत पडळकर, पो.हवालदार संतोष साठे, पो.नाईक मुकंद कुडेकर, अंमलदार शितल गवळी व पोलिस कर्मचारी पथक यांना तात्काळ बोलावून घेतले.

पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्याबाबत मोठा निर्णय

तहसीलदार यांचेकडील नायब तहीसलदार ज्ञानदेव यादव व दोन शासकीय पंच यांना पोलिस स्टेशन येथे बोलावून घेवून त्यांना माहिती दिली. आम्ही स्वतः पोलिस स्टाफ व पंच असे एन.डी.पी.एस.ऑक्ट मधील छापा टाकण्याच्या तरतुदीचे तंतोतंत पालन करून सरकारी वाहन क.एम.एव.१२/पी.टी.२२०९ व एम.एच.४२/बी.६७२१ मधुन रवाना होवुन २०:३० वा चे सुमारास न्हावरा गावचे हददीत न्हावरा कारखान्याचे व आलेगाव जाणारे रोडवे उत्तरेस माळरानावर असलेल्या एकच पाल आम्हास गाडीतून दिसली.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

पतीच्या मृत्यूनंतर 3 तासातच पत्नीनंही सोडले प्राण...

मोटार रस्त्याच्या बाजूला उभे करून आम्ही सर्वजण खाली उतरून त्या पालास चारही बाजूंनी वेढा टाकला. त्यावेळी सदर पालामध्ये चार व्यक्ती बसलेले होते. सदर व्यक्तींना ताब्यात घेवून नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव व सरकारी पंच यांनी मिळून सदर पालाची झडती घेतली. यावेळी पालामध्ये एकूण दोन गोणीमध्ये खाकी कागदात व प्लॅस्टिक कागदात गुंडाळलेले एकूण ३५ पुढे मिळून आले. सदर पुढयांपैकी एक पुढा पंचा समक्ष उघडून पाहिला असता त्यामध्ये हिरवट रंगाचा साधारण ओलसर असा उग्र वासाचा झाड पाल्यासारखा पदार्थ दिसून आला. संबंधित पदार्थ हा गांजा असल्याची खात्री झाली. सदर ३५ पुढयांचे वजन करून पाहिले असता एकूण ७८ किलो वजनाचा १६ लाख ३८ हजार रूपयांचा गांजा मिळून आला.

शिक्रापूरमधील बोगस डॉक्टरवरील संशय बळावला; तडजोडीचीही चर्चा

सुनिल रूपराव पवार, आकाश सर्जेराव पवार, विशाल कैलास मोहिते, प्रकाश सर्जेराव पवार (सर्व रा. टाकरखेड ता.विखली जि. बुलढाणा) यांनी त्यांचे कब्जामध्ये ७८ किलो वजनाचे ३५ पुढे किंमत १६ लाख ३८ हजार किंमतीचा 'गांजा' अंमली पदार्थ घावूक व किरकोळ विक्री करण्याचे उददेशाने व स्वतःचे फायदयासाठी जवळ बाळगले व साठवणूक केल्याचे स्थितीत मिळून आला.

शिरूर तालुक्यात उभे राहणार ऑक्सिजनचे दोन प्रकल्प

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'
गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे पोलिस अंमलदार खुटेमाटे यांनी फिर्याद दिली असून, वरील चारही आरोपी विरोधात एन डी पी एस कायदा १९८५ चे कलम ८(क),२०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे हे करीत आहेत.

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka crime news shirur police raid on navhare ganja
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे