कारेगावमधील बनावट डॉक्टरचा आणखी एक 'प्रताप' उघडकीस

कारेगाव येथील बनावट डॉक्टरचा यामुळे आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. याबाबत चंदन सुभाष नारखेडे यांनी रांजणगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिरूर: कारेगाव (ता. शिरूर) येथील श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बनावट डॉक्टरने हॉस्पिटल जवळील गाळा भाड्याने मेडिकल टाकण्यासाठी देतो असे सांगून ३० लाख रुपये घेऊन, गाळा अद्याप ताब्यात न देता घेतलेले डिपॉझिट पैकी २४ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत रांजणगाव पोलिस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रांजणगाव पोलिसांनी दिली.

...अन MBBS डॉक्टरच निघाला मुन्नाभाई

कारेगाव येथील बनावट डॉक्टरचा यामुळे आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. याबाबत चंदन सुभाष नारखेडे यांनी रांजणगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत महेश किसन पाटील (खरे नावः मेहमूद फारुक शेख) रा पीर बुऱ्हाणपूर, ता जि नांदेड) या बनावट डॉक्टरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून बारा जुलै २०१९ ते आज पर्यंत फिर्यादी कडून कारेगाव (ता. शिरूर) येथे जमीन गट नंबर २८५ मधील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स या इमारतीमधील मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलचे ताब्यातील एक गाळा मेडिकलसाठी चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर देतो असे बनावट डॉक्टर महेश किसन पाटील (मेहमूद फारुक शेख) याने सांगितले. १२ जुलै २०१९ तीस लाख रुपये घेऊन आज पर्यंत गाळा ताब्यात न देता गाळ्यासाठी घेतलेल्या ३० लाख पैकी २४ लाख रुपये आज पर्यंत न देता फिर्यादीची फसवणूक केली आहे.

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

...अन् शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्याची झाली बोलती बंद!

याबाबत रांजणगाव पोलिस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहेत.

Title: shirur taluka crime news shree morya hospital bogus doctor