तळेगाव ढमढेरेत घरा शेजारील झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी...

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सहा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

तोडलेले झाड आमच्या इकडे टाकू नका, असे म्हटल्याने दोघांमध्ये वादिवाद झाला. त्यांनतर वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले.

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. Shirur) येथील कमेवाडी या ठिकाणी घराशेजारील बाभळीचे झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे राजाराम दत्तात्रय भुजबळ, मंगेश राजाराम भुजबळ, ऋषिकेश अवधूत भुजबळ, मीना अवधूत भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर अवधूत भुजबळ यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Death: जुन्नर तालुक्यात पतसंस्थेत गोळीबार व्यवस्थापकाचा मृत्यू

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कमेवाडी मध्ये राहणारे मंगेश भुजबळ यांनी त्यांच्या घराशेजारील झाड तोडले. यावेळी ऋषिकेश भुजबळ यांनी तोडलेले झाड आमच्या इकडे टाकू नका, असे म्हटल्याने दोघांमध्ये वादिवाद झाला. त्यांनतर वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. दोघा गटांनी कुऱ्हाड घेऊन त्याने मारहाण केल्याने घडलेल्या घटनेत मीना भुजबळ व मंगेश भुजबळ हे दोघे जखमी झाले आहेत.

Murder: पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला कुऱ्हाडीसह अटक

याबाबत दोन्ही गटांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे राजाराम दत्तात्रय भुजबळ, मंगेश राजाराम भुजबळ, ऋषिकेश अवधूत भुजबळ, मीना अवधूत भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर अवधूत भुजबळ यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेश माने हे करत आहेत.

School: शिरुर तालुक्यातील देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा अखेर पदार्फाश

Shikrapur Police: शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची कारवाईस टाळाटाळ...?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news two group fighting at talegaon dham